वर्धा : आचार्य विनोबा भावे यांना जयंती दिनी विविध कार्यक्रमातून आदरांजली वाहण्यात आली. शुक्रवारी झालेल्या जयंती कार्यक्रमात विविध शाळा, महाविद्यालय येथील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.मातोश्री कनिष्ठ महाविद्यालय वर्धा : दहेगाव (मिस्कीन) येथील मातोश्री कनिष्ठ महाविद्यालय येथे आचार्य विनोबा भावे यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनिल गायकवाड होते. त्यांनी विनोबा भावे यांच्या जीवन कार्याची माहिती दिली. संस्थेचे सचिव प्रमोद चौधरी यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला प्राचार्य उगले, प्रा. आशिष मुडे, प्रा. मनोज गायकवाड, यशपाल इवनाथे, रवींद्र मोरणकर आदींनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन कोमल खासदार यांनी तर प्रस्तावना पुजा मोहिते हिने केली. आभार अंकेश मसराम यांनी मानले.लोक महाविद्यालयात वर्धा : स्थानिक लोक महाविद्यालय येथे ग्रंथालय व सांस्कृतिक विभागाद्वारे विनोबा भावे यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी व्यासपीठावर संस्था अध्यक्ष डॉ. गजानन कोटेवार, प्राचार्य डॉ. पुष्पा तायडे, उपप्राचार्य सुनिल पाटणे उपस्थित होते. डॉ. कोटेवार यांनी राष्ट्र निर्माणाचे कार्य आपल्याला पुढे न्यायचे आहे. तेव्हा शिक्षकांनी ज्ञानदानाचे कार्य करावे, असे विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन प्रा. मोहन सोनूरकर यांनी केले. आयोजनाला प्रा.डॉ. अविनाश साहूरकर, प्रा. डॉ. राजीव जाधव, प्रा.डॉ. अविनाश सुरकार, प्रा.महेंद्र सहारे, प्रा. भाष्कर वाळके, प्रा. सोनाली बहादूरे, प्रा. प्रशांत येऊलकर, प्रा. धात्रक प्रा. विकास नाखले, कविता सानप, उपमुख्याध्यापक श्याम चित्रकार, उपप्राचार्य रेखा अडसुळे, पर्यवेक्षिका सुजाता भालशंकर, सुलभा बिदलकर, विद्या सुरकार, गं्रथपाल अलका म्हसलकर, सहायक गं्रथपाल संजय भोयर, सचिन डहाके यासह विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. विनोबांना अभिवादनवर्धा : संत विनोबा यांची जयंती भूदान जयंती म्हणून साजरी करण्यात आली. विनोबा भावे यांनी भूदान चळवळीत भारतभर पायी फिरून त्यांनी लाखो एकर जमीन दानात मागितली. गरीब शेतमजूरांना जमिनीची मालकी दिली. हा अनोखा उपक्रम त्यांनी चालविला म्हणून विनोबांची जयंती भूदान जयंती म्हणून साजरी केली जाते, असे मत मुख्याध्यापक दिनकर पाटील यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान तन्वी ताल्हण हिने भूषविले. कार्यक्रमाचे संचालन सेजल वासनिक व सुशोभिता कांबळे यांनी केले. विद्यार्थ्यांनी भाषणातून विनोबांच्या जीवनावर व विचारांवर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे आयोजन राठोड यांच्या मार्गदर्शनात केले. आभार प्रदर्शन श्रध्दा बाभळे हिने केले. कार्यक्रमाच्या आयोजनाला करूणा कळवनकर, वंदना वैष्णव, दुष्यंता मून, हेमंत पराते, सुरेंद्र दीक्षित, सागर निकोरे, परसराम राठोड यासह आदींनी सहकार्य केले.(लोकमत न्यूज नेटवर्क)
जयंतीनिमित्त विनोबा भावेंना अभिवादन
By admin | Published: September 14, 2015 2:02 AM