शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
2
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
3
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
4
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
5
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
6
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
7
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
8
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
9
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
10
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
11
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
12
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
13
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
14
Pune Crime: महिलेची हत्या, पोत्यात बांधून झुडपात फेकला मृतदेह; घटना कशी आली उघडकीस?
15
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
16
प्रसाद ओकने असं काय विचारलं की मंंजिरीने थेट चिमटाच गरम केला? पती-पत्नीचा धमाल व्हिडीओ व्हायरल
17
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
18
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
19
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार
20
सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी

आचारसंहितेचे उल्लंघन अठराशेवर फलक हटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 12:28 AM

लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू होताच आदर्श आचारसंहिताही लागू करण्यात आली. परंतु, आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात प्राप्त होताच निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कारवाईचा बडगा उगारण्यात आला.

ठळक मुद्देलोकसभा मतदारसंघात २४ चेक पोस्ट : धामणगाव, मोर्शीत सर्वाधिक कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू होताच आदर्श आचारसंहिताही लागू करण्यात आली. परंतु, आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात प्राप्त होताच निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कारवाईचा बडगा उगारण्यात आला. १० मार्च ते १९ मार्च या कालावधीत सहाही मतदार संघांतील १,८२३ पोस्टर, बॅनर भिंतीवरील लिखित फलकांवर कारवाई करण्यात आली आहे.वर्धा लोकसभा मतदारसंघातील वर्ध्यासह आर्वी, हिंगणघाट व देवळी या चार विधानसभा मतदारसंघासह अमरावती जिल्ह्यातील धामणगाव व मोर्शी या दोन विधानसभा मतदार संघांचा समावेश आहे. त्यामुळे वर्धा जिल्ह्यासह अमरावती जिल्ह्यातीलही दोन विधानसभा मतदारसंघांवर लक्ष ठेवताना प्रशासनाची मोठी कसरत होते.आचारसंहितेच्या काळात नेत्यांचे छायाचित्र असलेले शासकीय योजनांचे फलक काढणे, उद्घाटन व भूमिपूजनाचे फलक झाकणे तसेच नेत्यांचे छायाचित्र काढून रंगविलेल्या भिंती झाकणे किंवा ते चित्र मिटविणे बंधनकारक आहे.तसेच कोणत्याही फलकाद्वारे मतदार आकर्र्षित होणार नाही, याची खबरदारी घ्यावयाची असते. तरीही मोठ्या प्रमाणात याकडे दुर्लक्ष करून आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी निवडणूक विभागाकडे करण्यात आल्या. या तक्रारींच्या आधारे सहाही मतदार संघांतील १४८ रंगविलेल्या भिंती, ७१४ पोस्टर, ३७८ बॅनर तर ५८३ इतर अशा एकूण १ हजार ८२३ प्रकरणांसंदर्भात कारवाई करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी आचारसंहिता लागूनही फलक झाकण्यात आले नाही. निवडणूक विभागाकडे तक्रारी केल्यावरच कारवाई होताना दिसत आहे. संबंधित विभाग स्वत: कारवाईकरिता पुढाकार घेत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.आर्वी विधानसभा क्षेत्रातून साडेबारा लाखांची रोकड जप्तवर्धा लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा क्षेत्रात विविध पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. या पथकातील एसएस टीमचे प्रमुख सांभारे यांनी १३ मार्च रोजी आर्वी विधानसभा क्षेत्रात २ लाख ४८ हजार १०० रुपयांची रोकड जप्त करून उपकोषागार, आष्टी येथे जमा केली. संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला. याच परिसरात १९ मार्चला १० लाख रुपयांची रोकड जप्त केली. ती रक्कमही उपकोषागार, आष्टी येथे जमा केली आहे.मोर्शीत लागले १३ चेकपोस्टनिवडणूक कालावधीत एक लाख रुपयांवर रक्कम हाताळण्यावर बंदी आहे. असे असतानाही पैसा आणि दारुच्या भरवशावर मतदारांना आकर्षित करण्याची शक्यता जास्त असल्याने कोणत्याही वाहनातून दारू आणि पैशाची वाहतूक होता कामा नये, याकरिता निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार वर्धा लोकसभा मतदारसंघात एकूण २४ चेक पोस्ट लावण्यात आले आहेत. यामध्ये धामणगाव येथे ३, मोर्शीत १३, आर्वीत ५ तर हिंगणघाट येथे ३ चेक पोस्ट लावण्यात आले आहेत.सहाही मतदारसंघात १०७ पथकांचा वॉचलोकसभा निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी तसेच मतदारांना आमिषापासून दूर ठेवण्याकरिता आणि आदर्श आचारसंहितेचे पालन व्हावे म्हणून वर्धा लोकसभा मतदारसंघातील धामणगाव, मोर्शी, आर्वी, देवळी, हिंगणघाट व वर्धा या सहाही विधानसभा मतदारसंघात एसएस टीम, व्हिडिओ स्कॅनिंग टीम, फ्लार्इंग स्क्वॉड व व्हिडिओ व्हिवींग टीम अशी विविध पथके तयार करण्यात आली आहेत. सहाही मतदारसंघात एकूण १०७ पथके कार्यरत असून हिंगणघाट व देवळी मतदारसंघात इतरांच्या तुलनेत जास्त पथक कार्यरत आहेत.

टॅग्स :Electionनिवडणूक