लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सेवाग्राम विकास आरखड्यातून विकासकामांचा झंझावात सुरू आहे. परंतु, कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांची नियोजनशून्यता आणि दुर्लक्षित धोरणामुळे अल्पावधीतच नागरिकांकडून सदोषतेचा ठपका ठेवला जात आहे. यातून व्हीआयपी रस्त्याही सुटला नाही. मागील पाच ते सहा दिवसांपासून या सिमेंट रस्त्यावर पाणी टाकले नसल्याने काम पूर्ण होण्यापूर्वीच काही ठिकाणी तडे गेल्याची ओरड होत आहे.स्थानिक शासकीय विश्रामगृहालगतच्या व्हीआयपी रस्त्याच्या सिमेंटीकरणाचे काम सेवाग्राम विकास आराखड्याअंतर्गत सुरू आहे. दोन कोटी रुपयांच्या निधीतून नालवाडी चौकापर्यंत या रस्त्याचे सिमेंंटीकरण करण्यात येणार आहे. या कामाचा कंत्राट जे. पी. कन्स्ट्रक्शन कंपनीने घेतला असून प्रत्यक्ष काम मात्र स्थानिक कंत्राटदाराकडून केले जात आहे. या रस्त्याच्या काही भागाचे सिमेंटीकरण झाले असून त्यावर पाणी मुरविण्याकरिता पोते झाकण्यात आले आहे. मात्र, मागील पाच ते सहा दिवसांपासून यावर पाणी टाकण्यात आले नसल्यामुळे अल्पावधीतच या रस्त्याला जागोजागी तडे गेल्याने बांधकाम सदोष झाल्याची ओरड स्थानिकांकडून केली जात आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्चून बांधण्यात येणाºया या व्हीआयपी मार्गाच्या बांधकामावर वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.दुष्काळातही सिमेंटीकरणाचा सपाटासर्वत्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. वर्ध्यासह लगतच्या सर्व गावात पाणीबाणी निर्माण झाली असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून दहा गावांचा पाणीपुरवठा तात्पुरता बंद करण्यात आला आहे. शहरासाठीही दहा दिवस पुरेल इतकेच पाणी शिल्लक असल्याने मोठी पंचाईत होणार आहे. असे असतानाही सिमेंटीकरणाच्या कामाचा सपाटा सुरू आहे. त्यामुळे या रस्त्याची पाण्याची आवश्यकता कशी पूर्ण केली जाईल? पाण्याअभावी कोट्यवधीच्या खर्चातून बांधलेल्या रस्त्यांची अल्पावधीच वाट लागणार आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत या सिमेंटीकरणावर निधीची उधळपट्टी कशासाठी? असा प्रश्न सुज्ञ नागरिकांकडून विचारला जात आहे.
व्हीआयपी रस्त्यालाही जाताहेत तडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 10:26 PM
सेवाग्राम विकास आरखड्यातून विकासकामांचा झंझावात सुरू आहे. परंतु, कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांची नियोजनशून्यता आणि दुर्लक्षित धोरणामुळे अल्पावधीतच नागरिकांकडून सदोषतेचा ठपका ठेवला जात आहे. यातून व्हीआयपी रस्त्याही सुटला नाही. मागील पाच ते सहा दिवसांपासून या सिमेंट रस्त्यावर पाणी टाकले नसल्याने काम पूर्ण होण्यापूर्वीच काही ठिकाणी तडे गेल्याची ओरड होत आहे.
ठळक मुद्देपाण्याचा अभाव : सदोष बांधकामाची ओरड