लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आपला मताधिकार समाजाची दिशा निर्धारित करीत असतो. लोकशाहीमध्ये लोकांचा अधिकाधिक विश्वास घट्ट करण्यासाठी लोकांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे. लोकशाहीत लोक जागृत झाले तर त्यांच्या अपेक्षा आणि आकांक्षांची पूर्तता होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले. पब्लिक रिलेशन्स सोसायटी आॅफ इंडियाच्या वर्धा चॅप्टरच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात राष्ट्रीय जनसंपर्क दिवस समारंभात ते मार्गदर्शन करताना बोलत होते.पब्लिक रिलेशन्स सोसायटी आॅफ इंडियाच्या वर्धा चॅप्टरच्यावतीने जनसंपर्क दिवस कार्यक्रम पार पडला. यंदाचा विषय ‘भारतीय लोकशाही- सार्थक निवडणुकीचा मंत्र’ हा होता. या विषयावर वर्षभर चर्चा, कार्यक्रम आणि उपक्रम आयोजित करण्यात येतील असे यावेळी सांगण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाचे प्र-कुलगुरु डॉ. आनंदवर्धन शर्मा, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) स्मिता पाटील, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथील डॉ. विजय एल. धारूरकर यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक अनिलकुमार राय यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन बुद्धदास मिरगे यांनी केले तर आभार प्रफुल्ल दाते यांनी मानले. कार्यक्रमात पीआरएसआयच्यावतीने वर्धेतील बालरोग तज्ज्ञ तथा वैद्यकीय जागृतीमंचचे अध्यक्ष डॉ. सचिन पावडे यांना जनसंपर्क सन्मान प्रदान करण्यात आला. यावेळी जनसंपर्क दिवस विशेषांकांचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाला संजय इंगळे तिगांवकर, राजेश लेहकपुरे, डॉ. अख्तर आलम, डॉ. अनवर अहमद सिद्दीकी, डॉ. रामप्रकाश यादव, विनेश काकडे, संदीप घानोकर, सचिन घोडे, इब्राहिम बक्ष, प्रमोद गिरडकर, मुरलीधर बेलखोडे, डॉ. आलोक विश्वास, प्रा. किशोर वानखेडे, अमोल देशमुख, श्वेता क्षीरसागर, पराग ढोबळे, प्रवीण गावंडे, रूपाली अलोने, अनुपम रॉय, चेतन भट्ट, रंजीत कुमार, वैभव उपाध्याय आदींची उपस्थिती होती.
लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 11:42 PM
आपला मताधिकार समाजाची दिशा निर्धारित करीत असतो. लोकशाहीमध्ये लोकांचा अधिकाधिक विश्वास घट्ट करण्यासाठी लोकांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे.
ठळक मुद्देशैलेश नवाल : सचिन पावडे यांना जनसंपर्क सन्मान प्रदान