लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : तालुक्यातील वडगाव येथे शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. यात गोठा जळून राख झाला असून नागरिकांच्या सतर्कतेने या आगीपासून गाव थोडक्यात बचावले. ही घटना मंगळवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास घडली.वडगाव येथील गावालगत असलेले विद्युत ट्रान्सफार्मर जळाल्याने विद्युत तारामधून निघणाऱ्या आगीच्या ठिणगीने भडका उडाला. या आगीने रौद्रपूर धारण करुन गावाच्या दिशेने वाटचाल सुरु केली होती. ही बाब वेळीच गावकऱ्यांच्या लक्षात येताच धाव घेतल्याने मोठी हानी टळली. या आगीत सुभाष मून याचा गावालगत असलेला बैलाचा गोठा जळाला. गोठ्याला आग लागताच नागरिकांनी गोठ्यातील बैल बाहेर काढल्याने त्यांचे प्राण वाचले. पण, आगीत बैलबंडी, जनावरांचा चारा आणि शेतीपयोगी साहित्यांची राख झाली. ही आग सुनिल मून यांच्या घरापर्यंत पोहोचताच सर्व गावकºयांनी पाण्याचा मारा करुन आगीवर नियंत्रण मिळविले. अर्ध्यातासाच्या अथक परिश्रमानंतर ही आग आटोक्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. यात खतांचे ढिगारेही जळाले. ही आग आटोक्यात आणण्याकरिता ऋषीकेश रोकडे, गणेश लडी, नारायण लडी, संदिप वाउनफासे, आशिष लडी, वैभव रोकडे, अनिकेत मुळे आदिंनी सहकार्य केले.महावितरणच्या दुर्लक्षित धोरणाचा परिणामगावात अनेक ठिकाणी विद्युुत तारा लोबकाळत आहे. गावाच्या बाहेर नागरिकांचे खताचे ढिगारे तसेच पावसाळ्यातील इंधनाची सोय म्हणून जळाऊन लाकडे आणि इंधनही गोळा करुन ठेवले आहे. त्यामुळे या लोंबकळणाºया तारांचा बंदोबदस्त करण्याची मागणी अनेकदा करण्यात आली. परंतु महावितरणने याकडे दुर्लक्ष केल्याने ही घटना घडली. नागरिकाचे वेळीच लक्ष गेल्याने मोठा अनर्थ टळला. त्यामुळे आता तरी लोंबकळणाºया तारांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
वडगावात आग; गोठ्याची राखरांगोळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 11:52 PM
तालुक्यातील वडगाव येथे शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. यात गोठा जळून राख झाला असून नागरिकांच्या सतर्कतेने या आगीपासून गाव थोडक्यात बचावले. ही घटना मंगळवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास घडली. वडगाव येथील गावालगत असलेले विद्युत ट्रान्सफार्मर जळाल्याने विद्युत तारामधून निघणाऱ्या आगीच्या ठिणगीने भडका उडाला.
ठळक मुद्देथोडक्यात बचावले गाव : नागरिकांच्या सतर्कतेने मोठी हानी टळली