शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

७५.६८ कोटी प्राप्त तरीही कृषीपंपाची प्रतीक्षा

By admin | Published: May 27, 2017 12:28 AM

सिंचनाकरिता शेतकऱ्यांना मदत मिळावी याकरिता शासनाकडून कृषी पंप देण्याची योजना आहे.

 कार्यालयात चकरा : अनुदानानंतरही शेतकरी वंचित रुपेश खैरी । लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : सिंचनाकरिता शेतकऱ्यांना मदत मिळावी याकरिता शासनाकडून कृषी पंप देण्याची योजना आहे. वर्धा जिल्ह्यात ही योजना पूर्णत्त्वास नेण्याकरिता तब्बल ७५ कोटी ६८ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. असे असताना जिल्ह्यात कृषी पंपाची प्रतीक्षा यादी मात्र कायमच असल्याचे दिसते. जिल्ह्यात आजच्या घडीला तब्बल ३ हजार २४९ शेतकऱ्यांना कृषी पंपाच्या जोडणीची प्रतीक्षा आहे. सिंचनाची सुविधा वाढावी याकरिता शेतकऱ्यांना कृषी पंप देण्याची योजना अंमलात आणण्यात आली. शिवाय शेतकऱ्यांवर येत असलेला वीज देयकाचा भार कमी करण्याकरिता सौर कृषी पंपाचीही योजना अंमलात आणली. मात्र जिल्ह्यात पाहीजे त्या तुलनेत या योजनेला प्रतिसाद मिळला नाही. याच्या कारणाची मिमांसा केली असता सदर पंप सर्वसाधारण शेतकऱ्यांना परवडणारे नसून ते आर्थिक दृष्ट्या महाग ठरत असल्याच्या प्रतिक्रीया काही शेतकऱ्यांकडून मिळाल्या आहेत. यामुळे त्यांच्याकडून विजेवर चालणाऱ्या कृषी पंपाकडेच शेतकऱ्यांचा कल असल्याचे दिसून आले. जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या जलयुक्त शिवार अभियानासह पाणी अडविण्याकरिता अनेक योजना राबविण्यात आल्या आहेत. येत्या दिवसात याचा लाभ शेतकऱ्यांना होणार आहे. जिल्ह्यातील शेतशिवारात उपलब्ध पाण्यामुळे आपणही सिंचन करून आर्थिक समृद्धी साधावी याकरिता शेतकऱ्यांनी महावितरणकडे कृषी पंप मिळण्याकरिता अर्ज सादर केला आहे. त्यांना कृषी पंपाच्या जोडणीची अपेक्षा असताना त्यांना प्रतीक्षा यादीतच राहावे लागत आहे. जिल्ह्याला मिळणाऱ्या अनुदानातून शेतकऱ्यांच्य शेतात वीज नेण्याकरिता आवश्यक असलेले साहित्य खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली आहे. त्यांच्याकडून पंपाच्या जोडणीकरिता महावितरण कार्यालयात चकरा मारणे सुरू असून पंपाच्या जोडणीची प्रतीक्षा आहे. प्रतीक्षा यादीतील शेतकऱ्यांना पंप जोडणीची आवश्यकता निर्माण झाली आहे. वर्षभरात ४ हजार ८६९ शेतकऱ्यांना जोडण्या जिल्ह्यात ३१ मार्च २०१६ मध्ये ३ हजार ६७२ शेतकऱ्यांचे अर्ज प्रलंबित होते. तर एप्रिल २०१७ पर्यंत ४ हजार ४४६ शेतकऱ्यांनी अर्ज भरले. या वर्षभरात ४ हजार ८६९ शेतकऱ्यांना महावितरणकडून जोडण्या देण्यात आल्या आहेत. या सर्व घडामोडीअंती जिल्ह्यात आजच्या घडीला ३ हजार २४९ शेतकऱ्यांना कृषी पंपाची प्रतीक्षा आहे.