लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : तालुक्यातील सुकळी लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात येत असलेल्या मौजा दिघी येथील संपादित शेतजमिनीच्या अंतिम निवाड्यात फळझाडांचे मूल्यांकन रक्कम न मिळाल्याने शेतकºयांनी झाडांची रक्कम मिळण्याबाबत संबंधितांकडे तक्रार केली. पण, दुर्लक्ष केल्या जात असल्याने ही समस्या शासनदरबारी रेटून न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी माजी आमदार दादाराव केचे यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.शेतकºयांच्या समस्यांकडे वारंवार दुर्लक्ष केले जात आहे. ०७ आॅगस्टला विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर नियामक मंडळांच्या बैठकीत मागणी रेटण्यात आली. पण, यावेळी फळ झाडांच्या मोबदल्यात लघु पाटबंधारे विभागाने ३० टक्के दिलासा, १२ टक्के अतिरिक्त घटकांची देय रक्कम वगळून प्रस्ताव सादर केला. शेतकºयांवर अन्याय होत असल्याने हा प्रश्न शासन दरबारी मार्गी लावण्याची मागणी शंकर मिसाळ, कृष्णा मन्ने, सुरेश मन्ने, सुनील ढोक, गरड, मालु राऊत, मिसाळ यांनी केली आहे.
प्रकल्प बाधित शेतकºयांना योग्य मूल्यांकनाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 9:57 PM
तालुक्यातील सुकळी लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात येत असलेल्या मौजा दिघी येथील संपादित शेतजमिनीच्या अंतिम निवाड्यात.....
ठळक मुद्देमाजी आमदारांना निवेदन : समस्या शासन दरबारी रेटण्याची मागणी