लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जगात बालकांच्या होणाऱ्या एकूण मृत्यूपैकी १० टक्के बालमृत्यू अतिसारामुळे होतात. अशातच ज्या बालकाला वेळीच रोटा व्हायरसची प्रतिबंधात्मक लस दिली जाते त्या बालकाचे आरोग्य निरोगी राहते. त्यामुळे ही लस बालमृत्यू दर शून्यावर आणण्यासाठी फायद्याचीच ठरते. परिणामी, शासकीय रुग्णालयातूनही ही लस नि:शुल्क बालकांना देण्याचा मानस शासनाचा आहे. परंतु, प्रशिक्षण पूर्ण होऊनही ही लस जिल्ह्याच्या आरोग्य विभागाला अद्याप प्राप्त झालेली नाही. सदर लसीची प्रतीक्षा लसीकरण मोहिमेसाठी सज्ज असलेल्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांसह कर्मचाºयांना आहे.देशात ४० टक्के मुल-मुली रोटा व्हायरसची लागण होते. रोटा व्हायरस हा अत्यंत संक्रमणजन्य विषाणू आहे. इतकेच नव्हे तर अतिसाराचे सर्वात मोठे कारण रोटा व्हायरस आहे. ज्यामुळे चिमुकल्यांना रुग्णालयात दाखल करावे लागू शकते. इतकेच नव्हे तर दुर्लक्ष झाल्यास रुग्ण मुला-मुलींचा मृत्यूही होतो.रोटा संसर्गाची सुरूवात सौम्य अतिसाराने होते. त्यानंतर तो गंभीर रुप घेतो. वेळीच उपचार न मिळाल्यास शरीरातील पाणी आणि क्षार कमी होतात. पोटदुखी व उलटी होते, असे तज्ज्ञ सांगतात. एकूणच रोटा व्हायरस हा बाल मृत्यूचा आकडा वाढविण्यासाठी कारणीभूत ठरत असल्याने त्याला पायबंध घालण्यासाठी शासनाने विडा उचलला आहे.त्याचाच एक भाग म्हणून वैद्यकीय अधिकाºयांपासून ते गाव पातळीवर काम करणाºया आशा स्वयंसेविकेपर्यंतच्या आरोग्य यंत्रणेतील अधिकाºयांसह कर्मचाºयांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. शिवाय वर्धा जिल्ह्यातील आरोग्य प्रशासन रोटा व्हायरस लसीकरण मोहीम जिल्ह्यात राबविण्यासाठी सज्जही आहे; पण लसच मिळाली नसल्याने प्रत्यक्ष काम कसे करावे, असा प्रश्न सध्या अधिकाºयांना भेडसावत आहे. त्यामुळे या प्रकरणी वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष देत योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे.तोंडावाटे दिली जाते लसबालमृत्यू रोखण्यासाठी प्रभावी ठरणाºया रोटा व्हायरसची प्रतिबंधात्मक लस बालकांना सहा, दहा व १४ आठवड्यांनी तोंडावाटे दिली जाते. बालकांचे निरोगी आरोग्य हा उद्देश जिल्हा प्रशासनातील आरोग्य विभाग तसेच शासनाचा असला तरी सध्या सदर लसीची प्रतीक्षा वर्धा जिल्ह्याच्या आरोग्य विभागाला आहे.रोटा व्हायरसची प्रतिबंधात्मक लस ही सुरक्षीत लस आहे. पूर्वी ती केवळ खासगी रुग्णालयात मिळायची. तर बाल मृत्यू शून्य करण्यासाठी प्रत्येक शासकीय रुग्णालयातून ही लस नि:शुल्क बालकांना देण्याचा मानस शासनाचा आहे. लसीकरण मोहीम राबविण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाºयांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. येत्या काही दिवसात लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे.- अजय डवले, जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा.
आरोग्य प्रशासनाला रोटा व्हायरस लसची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2019 10:22 PM
जगात बालकांच्या होणाऱ्या एकूण मृत्यूपैकी १० टक्के बालमृत्यू अतिसारामुळे होतात. अशातच ज्या बालकाला वेळीच रोटा व्हायरसची प्रतिबंधात्मक लस दिली जाते त्या बालकाचे आरोग्य निरोगी राहते.
ठळक मुद्देबालमृत्यू दर शून्य करण्यास ठरते प्रभावी