वर्धा : प्रकल्पात येवा वाढल्याने सेलू तालुक्यातील बोर प्रकल्पाचे ९ दरवाजे ३० सेंमी सोमवारी सकाळी १० वाजता उघडण्यात येणार असून १७२ घन.मी/से विसर्ग बोर नदी पात्रात सोडण्यात येणार आहे. नदी काठावरील गावांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे.
सेलू तालुक्यातील बोरखेडी कला येथील सतत च्या पाण्यामुळे नाल्याला पूर असून रस्ता बंद करण्यात आला आहे. रात्री 2 च्या सुमारास 3 घरा मध्ये पाणी गेले असता सदर व्यक्तींना दुसरीकडे राहण्याची व्यवस्था केली आहे. कारंजा तालुक्यात रविवार पासून पडणाऱ्या सतत च्या पावसामुळे सावरडोह नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत आहे. हिंगणघाट तालुक्यातील पोथरा नदीच्या पुलावरून पाणी असल्याने सावंगी हेटी रस्ता बंद झाला आहे.
यशोदा नदीला पुर आल्यामुळे भगवा ते चानकी मार्ग बंद झाला आहे. पाणी पातळीत वाढ होत आहे. यशोदा नदीला पूर आल्यामुळे आलमडोह ते अल्लीपूर रस्ता बंद झाला आहे. पावसामुळज हिंगणघाट - पिंपळगाव रोड बंद झाला आहे.