अभिनय खोपडे
वर्धा : संबंध राज्यात गाजत असलेल्या आर्वी येथील डॉक्टर कदम यांच्या रुग्णालयातील गर्भपात प्रकरणाने आता वेगळेच वळण घेतले आहे. शासकीय रुग्णालयातील टास्क फोर्स आर्वी येथे कदम रुग्णालयात तपासणीसाठी शनिवारी सकाळी दाखल झाला. या पथकाकडून सुमारे पाच तास विविध कागदपत्रे तपासण्यात आली. रात्री उशिरापर्यंत हे तपासणीचे काम सुरूच होते.
कदम यांच्या घराची झडती घेण्यात आली असता वरच्या माळ्यावर काही रजिस्टर व वन्य प्राण्यांची कातडी आढळली. त्यानंतर लगेच वनविभागाच्या पथकाला पाचारण करण्यात आले. आर्वीचे वनपरिक्षेत्र अधिकारी येथे दाखल झाले. त्यांनी ते कातडे तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले आहे, अशी माहिती दिली आहे. वनविभाग व पोलिसांनी कदम यांच्या हॉस्पिटल, इमारतीची झडती घेतली. त्यात दहा फाईल व इतर कागदपत्रे पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.
दरम्यान, सकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयातील टास्क फोर्सचे पथक प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संगीता भिसे यांच्या नेतृत्वात दाखल झाले. या पथकात स्त्री व प्रसूती विभाग प्रमुख डॉ. मनीषा नासरे, आर्वी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मोहन सुटे, फॉरेन्सिक तज्ज्ञ यांचा समावेश होता. याशिवाय दोन परिचारिका यांच्या पथकाने वेगवेगळ्या पातळीवर रुग्णालयातील बाबींची तपासणी केली. जप्त करण्यात आलेले वन्य प्राण्यांचे कातडे हे काळविटाचे असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
कातडे सापडल्यामुळे कदम यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता असून आता वनविभागाने याप्रकरणी वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ च्या कलम ९.३९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी उपवनसंरक्षक शेपट, सहाय्यक वनसंरक्षक (प्रादेशिक व कॅम्पा) बोबडे यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी एन.एस. जाधव व त्यांचे सहकारी कातडी प्रकरणाचा तपास करीत आहे.
आरोग्य पथकाने तपासल्या या बाबी
आर्वी येथे गेलेल्या आरोग्य विभागाच्या पथकाने कदम रुग्णालयात हॉस्पिटलच्या रुग्णांचा व सोनोग्राफीच्या रुग्णांचा रिपोर्ट तपासला.