लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा/आर्वी : साधारणत: ३३ वर्षांपूर्वी १९ मार्च १९८६ मध्ये संपूर्ण देशाला हादरून सोडणारी यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण येथील शेतकरी साहेबराव करपे यांच्या सामूहिक आत्महत्या दिनानिमित्त वर्धा आर्वी येथे सर्व सामाजिक संघटनांनी एकत्र येत एक दिवसीय लाक्षणिक अन्नत्याग आंदोलन आयोजित करण्यात आले होते.साहेबराव करपे व मालती करपे या शेतकरी कुटुंबाने आपल्या चार मुलाबाळांसह पवनारजवळील दत्तपूर येथे आत्महत्या केली होती. ही देशातील शेतकऱ्याची पहिली आत्महत्या असून या देशाचे नागरिक म्हणून आत्महत्या केलेल्या असंख्य शेतकरी बांधवांप्रती आदर आणि आपले सामाजिक दायित्व समजून त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी तसेच शासनाच्या उदासीन धोरणांचा निषेध करण्यासाठी अन्नत्याग आंदोलन या दिवशी किसानपुत्रांकडून केले जाते. या देशव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून वर्ध्यात डॉ. आंबेडकर पुतळा परिसरातील हुतात्मा स्मारक येथे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. वर्धा येथील आंदोलनात सुधीर पांगूळ, प्रशांत देशमुख, विशाल चौधरी, राजेश धोबे, मिलिंद मोहोड, विशाल हजारे, अनिकेत भोयर, अॅड. दिनेश शर्मा, माधुरी पाझारे, स्वाती देशमुख, दीप्ती रघाटाटे, शनकर देशमुख, संदीप दहीगावकर, गिरजा राऊत तर आर्वी येथे मराठा सेवा संघाचे अध्यक्ष वीरेंद्र कडू, सुरेंद्र जाणे, बाळा जगताप, प्रशांत ढवळे, राजेश सोळंकी, संतोष डंभारे, प्रफुल्ल क्षीरसागर, चंद्रशेखर हिवाळे, रवींद्र घाडगे, नरेश निनावे, शुभम राजे, जिजाऊ ब्रिगेडच्या शुभांगी डंभारे, सीमा साळुंखे, अलका कहारे, शुभांगी गाठे, काळमोरे, माजी जि. प. सदस्य गजाननन गावंडे आदी आंदोलनात सहभागी झालेत. निंबू सरबत देऊन उपोषणकर्त्यांच्या उपोषणाची सांगता झाली.
वर्धा अन् आर्वीत अन्नत्याग आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 11:51 PM
साधारणत: ३३ वर्षांपूर्वी १९ मार्च १९८६ मध्ये संपूर्ण देशाला हादरून सोडणारी यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण येथील शेतकरी साहेबराव करपे यांच्या सामूहिक आत्महत्या दिनानिमित्त वर्धा आर्वी येथे सर्व सामाजिक संघटनांनी एकत्र येत एक दिवसीय लाक्षणिक अन्नत्याग आंदोलन आयोजित करण्यात आले होते.
ठळक मुद्देशासन धोरणांचा निषेध : विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा सहभाग