लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील पुलगाव येथे लष्करी दारू गोळा भांडार आहे. या दारुगोळा भांडारात बनविण्यात आलेले मात्र वापरण्यात न आलेले मुदतबाह्य झालेले बॉम्ब तसेच इतर ठिकाणाहून आलेले बॉम्ब निकामी करण्यासाठी सोनेगाव आबाजी, केळापूर आणि जामणी या तीन गावांचा सुमारे १ हजार एकर चा भूभाग अधिग्रहित करण्यात आलेला आहे. २० नोव्हेंबर रोजी सकाळी सुमारे ७.१५ वाजता दरम्यान जबलपूर मधील खमरिया आॅर्डनन्स फॅक्टरी मधील बॉम्ब निकामी करण्यासाठी आणण्यात आले होते.या स्फोटात मृत्यू पावलेले उदयवीर सिंग हे मध्यप्रदेश मधील जबलपूर जिल्ह्यातील खमरिया आॅर्डनन्स फॅक्टरी मध्ये तंत्रज्ञ म्हणून कार्यरत होते. ते मूळचे उत्तरप्रदेश राज्यातील मुरादाबाद जिल्ह्यातील चंदोशी या गावचे रहिवासी आहेत. त्यांचा मृतदेह त्यांच्या मुळगावी पाठविण्यात येणार असून यासाठी जिल्हा प्रशासनाची परवानगी घेण्यात येत आहे.
Wardha Blast; मृत उदयवीरसिंग यांचा मृतदेह मूळगावी उत्तरप्रदेशात जाणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 5:37 PM
स्फोटात मृत्यू पावलेले उदयवीर सिंग हे मध्यप्रदेश मधील जबलपूर जिल्ह्यातील खमरिया आॅर्डनन्स फॅक्टरी मध्ये तंत्रज्ञ म्हणून कार्यरत होते.
ठळक मुद्देमुरादाबाद जिल्ह्यातील चंदोशी या गावचे रहिवासी