शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
2
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
3
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
4
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
5
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
6
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
7
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
8
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
9
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
10
शादी मुबारक! पापाराझींच्या कमेंटवर तमन्ना भाटियाची अशी रिॲक्शन; विजय वर्माला हसू आवरेना
11
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
12
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
13
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
14
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
15
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
16
लहामटे विरुद्ध भांगरे... अकोलेतील मतविभागणी कोणाचे पारडे जड करणार? 
17
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
18
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
19
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
20
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा

Wardha Blast : स्फोटके निकामी करण्यासाठी अकुशल कामगारांचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 10:30 PM

कालबाह्य स्फोटके निकामी करण्यासाठी अकुशल कामगारांचा वापर करण्यात येत असल्याचा खळबळजनक आरोप स्फोटातील जखमींनी केल्यान कॅम्प प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे. सोनेगाव (आबाजी) परिसरात घडलेल्या घटनेने शहर व परिसर हादरून गेला.

ठळक मुद्देसोनेगाव व केळापूरवर शोककळा : दहशतीत गावे कंत्राटदार चांडक बंधूवर ग्रामस्थांचा प्रचंड रोष

प्रभाकर शहाकार ।लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव (वर्धा) : कालबाह्य स्फोटके निकामी करण्यासाठी अकुशल कामगारांचा वापर करण्यात येत असल्याचा खळबळजनक आरोप स्फोटातील जखमींनी केल्यान कॅम्प प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे. सोनेगाव (आबाजी) परिसरात घडलेल्या घटनेने शहर व परिसर हादरून गेला.दारूगोळा भांडारातील बॉम्ब निकामी करीत असताना नजीकच्या सोनेगाव आबाजी परिसरातील सरंक्षित क्षेत्रात बॉम्ब स्फोट होऊन पाच मजूर व एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला तर ११ कंत्राटी कामगार जखमी झाले. मृतकांमध्ये तीन तरूण सोनेगाव येथील तर दोन केळापूर येथील आहेत. या दोन्ही गावावर शोककळा पसरली असून नातेवाईक प्रचंड आक्रोश करीत होते.सोनेगाव व केळापूर तसेच घटना स्थळाची पाहणी केली असता. दोन्ही गावात दारूगोळा भांडार प्रशासन व शंकर चांडक या कंत्राटदाराविषयी प्रचंड रोष दिसून आला. या बॉम्ब स्फोटामुळे भांडार परिसरातील ग्रामस्थ दहशतीत आहेत.राज्याचे पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार यांचे सोनेगाव (आबाजी) हे मुळगाव असून घटनेच वृत्त कळताच घटनास्थळी भेट देऊन केळापूर, सोनेगाव येथील मृत परिवाराचे सांत्वन केले. तसेच त्यांनी सावंगी रुग्णालयात जावून जखमींची विचारपूस केली. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश बकाणे, देवळी न.प.च्या गटनेत्या शोभा रामदास तडस यांनी देखील घटनास्थळी भेट देऊन गावकऱ्यांना दिलासा दिला.या घटनेनंतर या दोन्ही गावात अनेकांच्या घरी चुलीही पेटल्या नव्हत्या. मंगळवारी सकाळी ही प्रक्रिया करीत असताना सोनेगाव येथील नारायण पचारे यांचे हातातून बॉम्बची पेटी पडून मोठा स्फोट झाला. या स्फोटात नारायणसह ६ जणांचा बळी गेला. निकामी करण्याच्या प्रक्रियेत या निकामी स्फोटकातून निघणारे धातूंचे अवशेष गोळा करण्याचे कामसुद्धा संबंधित कंत्राटदार कमी मोबदल्यात करून घेत होता, अशी माहिती विक्रम ठाकरे यांनी दिली. या कामापोटी या कामगारांना अल्प मजूरी दिल्या जात असल्याची खंत मृतक व जखमींच्या कुटुंबियांनी व्यक्त केली. 

बॉम्ब स्फोटातील दाहकता या घटनेतील बॉम्ब स्फोटातील दाहकता एवढी तीव्र होती की, मृतांच्या देहाच्या चिधंड्या उडाल्या. सदर घटना स्थळ हे पुलगाव शहरापासून १० ते १२ कि़मी. अंतरावर सोनेगाव- केळापूर या गावांच्या मध्ये आहे. सुरक्षेच्या कारणास्तव दारूगोळा भांडाराने प्रतिबंधित क्षेत्राचा हक्क सांगत पिपरी (खराबे), आगरगाव, नागझरी, ऐसगाव, मुरदगाव या पाच गावांचे पुनर्वसन करावे अशी मागणी होती. परंतु पूनर्वसन झाले नाही.केळापूर येथील मृत राजकुमार भोवते यांना एक भाऊ व आई असून भाऊ हा पोलीस पाटील आहे. आई संगीताला मुलगा परत येण्याची आस असून घटनेनंतर तिचा आक्रोश थांबत नव्हता. सोनेगाव येथील प्रभाकर वानखेडे यांची पत्नी नमिता ही प्रतिक व प्रतीक्षा या मुलांसह शोकाकूल अवस्थेत होती. घरचा कमावता धनी गेल्याने मुलाबाळाच्या भविष्याची चिंता तिने दुखदायकपणे बोलून दाखविली. सोनेगाव येथील ग्रामस्थ किशोर राऊत म्हणाले की, पोटासाठी गावकरी ही कामे करतात. परंतु त्यांना मिळणाऱ्या अल्प मोबदला तर त्यांच्या जीवावर कंत्राटदार व अधिकारी मजा करतात जी कामे कुशल कामगारांकडून करावी. ती या रोजंदारीवर असणाऱ्या मजूरांकडून केले जात असल्याचे सांगितले. 

प्रशासनाच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्हच्सरंक्षण विभागाच्या केंद्रीय दारूगोळा भांडाराच्या लष्करी तळात सरंक्षण विभागाची कोट्यावधी रुपयांची अति संवेदनशील स्फोटक असताना कालबाह्य झालेली स्फोटके निकामी करण्याचा कंत्राट स्फोटक तज्ज्ञांचा समावेश असलेल्या कंत्राटदाराला न देता रोजंदारी तत्वावर अकुशल कामगारांचा समावेश असलेल्या कंत्राटदाराला देण्यात आल्यामुळे सैनिकी प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह लागले. 

जखमींनी मांडली आपबितीया घटनेविषयी सोनेगाव येथील जखमी विक्रम ठाकरे या २० वर्षीय तरूणाने लोकमतला माहिती देताना सांगितले की, कालबाह्य झालेले स्फोटके निकामी करण्यासाठी अकुशल कामगारांचा वापर करण्यात येतो. व स्फोटके निकामी करण्याचा कंत्राट खासगीरित्या देण्यात येतो.

प्रशासन उदासीन का?च्यापूर्वी सुद्धा दारूगोळा भांडारात अशा प्रकारच्या अनेक घटनांतून कित्येकांना आपले जीव गमवावे लागले तर दारूगोळाचे कोट्याविधी रुपयांचे वित्तहाणी व प्राणीहाणी होऊनही संबंधित प्रशासन उदासीन का? असा प्रश्न जनमाणनसात केल्या जात आहे.

टॅग्स :Wardha Blastवर्धा स्फोटBombsस्फोटके