महेश सायखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महात्मा गांधी व आचार्य विनोबा भावे यांची कर्मभूमी, अशी ओळख असलेल्या वर्धा जिल्ह्यात देशी-विदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सेवाग्राम विकास आराखड्याच्या माध्यमातून विविध विकास कामे होत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे स्थळ असलेल्या वर्धा बसस्थानकाचे नुतनीकरण व विस्तारिकरण करण्यात येणार आहे. यासाठी ७ कोटी ७ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.वर्धा बसस्थानक परिसरात ग्रामीण बसेससाठी नऊ नवीन फलाट तयार करण्यात येणार असून तिकीट काऊंटर आदींची निर्मितीही करण्यात येणार आहे. वर्धा बसस्थानकाचा परिसर हा १.२०५ हेक्टरचा आहे. पूर्वी बसस्थानकाच्या मागील भागात वर्धा विभाग नियंत्रक कार्यालय होते. सध्या येथील हे कार्यालय सेवाग्राम रोडवरील औद्योगिक वसाहतीमध्ये हलविण्यात आले आहे. जुने विभाग नियंत्रक कार्यालय पाडून तेथे ग्रामीण बसेससाठी नवीन नऊ फलाट तयार करण्यात येणार आहेत. त्याच परिसरात महिला आणि पुरुष प्रवाशांसाठी नवीन प्रसाधनगृहाची निर्मिती करण्यात येणार आहे. याच भागात नवीन तिकीट काऊंटर तथा चालक-वाहकांसाठी विश्रांतीगृहाचे बांधकाम करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. शासनाने बसस्थानक विस्तारिकरणासाठी ७ कोटी ७ लाखांचा निधी मंजूर केला आहे. यातून वर्धा बसस्थानकाचा चेहरामोहरा बदलणार असल्याने पूर्वीच्या तुलनेत प्रवाशांना अधिक सुविधा उपलब्ध होणार आहेत.लगतचे आॅटो स्टॅण्डही हटविणारसध्या बसस्थानकालगत गांधी विद्यालयाच्या बाजूला बाहेरगावी जाणारे आॅटो, चार चाकी प्रवासी वाहतूक करणारी वाहने उभी केली जातात. त्यांना अधिकृत स्टॅण्ड म्हणून ही जागा देण्यात आलेली होती; पण आता बसस्थानकाचे विस्तारिकरण करण्यात येत असल्याने हे आॅटो स्टॅण्ड हटवावे लागणार आहे. परिणामी, आॅटो, वाहन चालकांना वाहने उभी करण्याकरिता पालिका प्रशासनाला अन्यत्र जागा उपलब्ध करून द्यावी लागणार आहे. शिवाय बसस्थानकाच्या समोर असलेल्या आॅटो चालकांनाही काही काळ तरी त्यांचे स्टॅण्ड हटवावे लागणार असल्याचेच दिसून येत आहे.मंत्र्यांनी घेतला आढावाराज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते शुक्रवारी वर्धा येथे दौºयावर आले आहे. याप्रसंगी त्यांनी वर्धा बसस्थानकाच्या नुतनीकरण तथा विस्तारिकरणाच्या सद्यस्थितीची माहिती जाणून घेतली. शिवाय काही कल्पना सूचविल्याचीही सुत्रांची माहिती आहे.वर्षभरात करावे लागणार काम पूर्णवर्धा बसस्थानकाच्या नुतनीकरण तथा विस्तारिकरणाचे कंत्राट पार्थ कन्स्ट्रक्शन कंपनी वर्धा यांना देण्यात आले आहे. सदर कंत्राटदार कंपनीकडून वर्धा परिवहन महामंडळाने सदर काम बारा महिन्यांत पूर्ण करून घेण्याचा करार करून घेतल्याचे सांगण्यात आले आहे.दुकाने, रसवंती हटविणारबसस्थानक नुतनीकरण व विस्तारिकरण काम करीत असताना वर्धा बसस्थानकात असलेल्या पानटपरीसह झुणका भाकर केंद्र व रसवंती आदी दुकाने हटविली जाणार आहे. येथून ग्रामीण भागासाठी सोडल्या जाणाºया बसेसना बसस्थानकाबाहेर जाण्यासाठी मार्ग करून दिला जाणार आहे. त्या अनुषंगाने वर्धा बसस्थानकातील काही व्यावसायिकांना गाळे रिकामे करण्याचे लेखी पत्रही देण्यात आले आहे.२०० वाहनक्षमतेचे वाहनतळवर्धा बसस्थानकाचे नुतनीकरण व विस्तारिकरणाच्या निश्चित करण्यात आलेल्या रेखाचित्रानुसार जुने वाहनतळ तोडून एकाच ठिकाणी सुमारे २०० वाहने उभी करता येईल, असे नवीन वाहनतळ तयार करण्यात येणार आहे. तसेच रापमंच्या अधिकारी व कर्मचाºयांसाठी वाहने उभी करण्यासाठी वेगळी व्यवस्था करण्यात येणार आहे.चारचाकी वाहनांसाठी वाहनतळच नाहीबसस्थानकाच्या तयार करण्यात आलेल्या रेखाचित्रात विविध बाबींचा उल्लेख करण्यात आला असला तरी प्रवाशांच्या नातेवाईक व निकटवर्तीयांसाठी सर्वात महत्त्वाचे असलेल्या चारचाकीच्या वाहनतळाचा कुठेही उल्लेख करण्यात आलेला नाही. सध्या स्थायी वाहनतळ नसल्याने वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस नागरिकांची वाहने बसस्थानकातून उचलून त्यांच्याकडून दंड वसूल करीत आहेत. वर्धा बसस्थानक परिसरात चारचाकी वाहने उभी करण्यासाठी जागा निश्चित करणे गरजेचे आहे.
वर्धा बसस्थानकाचे बदलणार रूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 1:01 AM
महात्मा गांधी व आचार्य विनोबा भावे यांची कर्मभूमी, अशी ओळख असलेल्या वर्धा जिल्ह्यात देशी-विदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सेवाग्राम विकास आराखड्याच्या माध्यमातून विविध विकास कामे होत आहेत.
ठळक मुद्दे७.७ कोटींचा आराखडा मंजूर : नवीन तिकीट काऊंटरसह नऊ फलाटांची निर्मिती