लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा: जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे. शुक्रवारी पाच रूग्ण पॉझिटिव्ह निघाले होते. शनिवारी सकाळी उपजिल्हाधिकारी यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे. ५५ वर्षीय उपजिल्हाधिकारी काही कामानिमित्त आपल्या मूळ गावी धुळे येथे गेले होते. परत आल्यानंतर त्यांनी स्वत:ला क्वारंटाईन करून घेत आपला स्त्राव तपासणीसाठी दिला होता. त्याचा रिपोर्ट आज पॉझिटिीव्ह आला. उपजिल्हाधिकारी नालवाडी परिसरातील पाटील नगर परिसरात वास्तव्यास असल्याचे प्रशासनाने सांगितले. प्रशासनाने उपाययोजना करण्यास प्रारंभ केला आहे.
वर्ध्याचे उपजिल्हाधिकारी कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 9:03 AM