शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
3
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
4
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
5
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
6
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
7
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
8
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
9
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
10
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
11
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
12
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
13
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
14
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
15
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
16
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
17
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
18
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
19
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
20
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप

वर्धा जिल्ह्यात सूर्य कोपला; साडेतीन हजार हेक्टरवरील संत्राबागांना झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2019 9:45 AM

वर्धा जिल्ह्यात संत्राबागांना झळा

ठळक मुद्देपाणी टंचाईचा फटकाशेतकऱ्यांची बागा वाचविण्याकरिता धडपड सुरु

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कारंजा (घाडगे) तालुका हा दुष्काळग्रस्त असल्याने यावर्षीच्या उन्हाळ्यात तीव्रता चांगलीच वाढली आहे. परिणामी तालुक्यातील साडेतीन हजार हेक्टरवरील सत्रा बागा धोक्यात आल्या आहे. शेतकऱ्यांनी या बागांना वाचविण्याकरिता धडपड सुरु केली आहे.कारंजा तालुक्यात मोठ्या प्रमाणात संत्रा पीक घेतले जाते. येथील शेतकऱ्यांचे हे प्रमुख पीक असून या पिकांवरच शेतकऱ्यांचे आथिक बजेट अवलंबून आहे. या पिकामुळे शेतकऱ्यांना संपन्नता मिळाली तर परिसरातील मजुरांना मोठ्या प्रमाणात रोजगारही मिळतो. परंतु मागील दोन ते तीन वर्षांपासून पर्जन्यमानात झालेली घट व आधुनिक तंत्रज्ञानामुळे वाढलेला पाण्याचा उपसा यामुळे भूजल पातळी झपाट्याने खाली जात आहे. विहिरीसह कुपनलिकाही कोरड्या झाल्याने संत्रा बागा वाचविण्याचे मोठे आव्हान शेतकऱ्यांपुढे उभे ठाकले आहे.तालुक्यात साडेतीन हजार हेक्टरवर संत्र्याची लागवड करण्यात आली आहे. या पिकांना जास्त पाणी लागत असल्याने बागायतदारांनी कुपनलिका केल्या. त्यामुळे उत्पादनात वाढ होऊन बागायतदारांना त्याचा बराच फायदा झाला. परंतु आता जलपातळी खालावल्याने पाणीप्रश्न निर्माण झाला आहे.मागील वर्षी झालेल्या अल्प पर्जन्यमानाने निर्माण झालेली ही दुष्काळी परिस्थिती बागायतदारांसाठी चिंता वाढविणारी ठरत आहे. गेल्या आठ दिवसापासून तापमानात वाढ झाल्याने विहीरी, कुपनलिका कोरड्या पडत आहे. एकीकडे पाण्याची टंचाई तर दुसरीकडे उन्हाच्या झळा यामुळे संत्राबागा वाळालयला लागल्या आहे.या लाखमोलाच्या बागा वाचविण्याकरिता बागायतदारांनी टँकरव्दारे पाणी विकत घेऊन झाडांना देण्याचा खटाटोप चालविला आहे. पण, या दुष्काळी परिस्थितीत टँकरचे दरही १ हजार रुपयाच्या वर गेल्याने विकतचे पाणी देणे बागायतदारांना न परवडणारे आहे. विकतचे पाणी किती दिवस देणार हा प्रश्न पडल्याने संत्रा बागायतदारांची चिंता दिवसेंदिवस वाढतच आहे. आतापर्यंत लाख रुपयाचे उत्पन्न देणारे झाडं डोळ्या देखत वाढत असल्याने बागायतदारांच्या डोळ्यात पाणी आली आहे. प्रशासकीय यंत्रणेकडून अद्यापही उपाययोजना न झाल्याने तत्काळ सुविधा पुरविण्याची मागणी बागायतदार शेतकऱ्यांकडून होत आहे.माझ्याकडे सात वर्षाची संत्रा बाग आहे. यावर्षी फळे येतील व केलेला खर्च निघून संसाराला आधार होईल, अशी आशा होती. परंतु दुष्काळाने त्यावर पाणी फेरले. संपूर्ण बागच पाण्याअभावी वाळून गेली.-पंकज मानकर, चंदेवाणीमाझ्या शेतावर २०० झाडांची फळबाग आहे. यावर्षी विहीर कोरडी झाल्याने संत्रा बाग वाळत आहे. संत्रा बाग वाचविण्यासाठी लागणारा खर्च कोठून करायचा हा प्रश्नच आहे.-पंजाबराव इंगळे, बागायदार, चंदेवाणीसंत्रा पिकांवर गेल्या दहावर्षापासून किडीच्या प्रमाणात वाढ होवूनही मोठ्या प्रमाणात खर्च करुन बागा वाचविल्या. परंतु यावर्षी पाणीच नसल्याने बागा डोळयादेखत वाळत आहे. त्यामुळे शासनाने बागा वाचविण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे.-रवी पठाडे, बागायतदार, सेलगाव (लवणे)

टॅग्स :agricultureशेतीdroughtदुष्काळ