शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
2
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
3
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
4
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
5
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
6
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
7
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
8
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
9
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
10
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
11
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
12
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
13
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
14
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
15
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
20
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...

राज्यात वर्धा जिल्ह्यात महिलांशी संबंधित गुन्ह्यांची सर्वाधिक नोंद ; एकूण दीड लाख प्रकरणे प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2018 2:12 PM

२०१६ मध्ये राज्यात महिलांशी संबंधित १ लाख ६५ हजार ३९३ प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहे. या प्रकरणांपैकी सर्वाधिक गुन्हे वर्धा जिल्ह्यात नोंदवण्यात आले आहेत.

ठळक मुद्दे११ हजार महिला पीडित विनयभंगाचे गुन्हे वाढले

आॅनलाईन लोकमतवर्धा : २०१६ मध्ये राज्यात महिलांशी संबंधित १ लाख ६५ हजार ३९३ प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहे. या प्रकरणांपैकी सर्वाधिक गुन्हे वर्धा जिल्ह्यात नोंदवण्यात आले आहेत. दरम्यान पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यांपैकी ५३.४७ टक्के प्रकरणाचे दोषारोप पत्र न्यायालयात दाखल झाले आहे. विशेष म्हणजे विनयभंगाच्या २०१५ मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यांपैकी ६१६७ गुन्ह्यांचा तपास अद्यापही प्रलंबित आहे. सदर माहिती अलिकडेच राज्यातील गुन्हेगारीचा लेखाजोखा मांडणारा क्राईम इन महाराष्ट्र २०१६ च्या अहवालात प्रसिद्ध करण्यात आला आहे. राज्यात महिलांच्या संदर्भातील गुन्ह्यांची आकडेवारी वाढत असताना गेल्या वर्षात महिलांशी संबंधित कायद्यांन्वये ३१ हजार २७५ गुन्ह्यांची नोंद झाली असून त्यामध्ये सर्वांधिक ११ हजार ९९६ गुन्हे विनयभंगाचे आहेत. राज्यात गतवर्षी दाखल झालेल्या एकूण गुन्ह्यांपैकी महिलांशी संबंधित गुन्ह्यांची टक्केवारी ११.९५ टक्के आहे. महिलांवरील अत्याचार, छेडछाड, विनयभंगासह अन्य १४ प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये सर्वाधिक प्रमाण विनयभंगाचे आहे. २०१५-१६ च्या तुलनेत २०१७ मध्ये हे प्रमाण २.६८ टक्क्यांनी घटल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. ३७ टक्के गुन्हें हे एकट्या विनयभंगाचे आहेत. राज्यात १० पोलीस आयुक्तालय आणि ३६ पोलीस जिल्हा ९ परिक्षेत्रातील ही माहिती असून शहर व ग्रामीण भागातील सर्व भागाचा यात समावेश आहे. २०१४ मध्ये महिलांशी संबंधित एकूण २६ हजार ६९३ गुन्हे दाखल झाले होते. त्यात १० हजार १ गुन्हे विनयभंगाचे होते. तर २०१५ मध्ये ३१ हजार १२६ गुन्हे दाखल झाले. यामध्ये ११ हजार ७१३ गुन्हे विनयभंगाचे आहेत. २०१६ मध्ये ३१ हजार २७५ गुन्हे दाखल झाले. यामध्ये ११ हजार ३९६ गुन्हे हे विनयभंगाचे आहेत. वर्धा जिल्ह्यात २०१३ मध्ये विनयभंगाच्या २२७ गुन्ह्यांची, २०१४ मध्ये १९२, २०१५ मध्ये २४३, २०१६ मध्ये १५२ तर २०१७ मध्ये नोव्हेंंबर अखेरपर्यंत १६४ गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा