लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: येथील सेलू तालुक्यातील आकोली येथे आयुर्वेदिक दवाखान्याच्या इमारत भ्रष्टाचाराची माहिती लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच, सेलू पसच्या उपसभापती सुनीता अडसड यांनी गुरुवारी या इमारतीची पाहणी केली तेव्हा त्या निकृष्ट दर्जा पाहून अवाक झाल्या.या इमारतीसाठी २० लाखांचा निधी मंजूर झाला होता व त्यापैकी बरीचशी रक्कम खर्चही झाली होती. असे असूनही या इमारतीची दशा मोडकळीला आलेल्या इमारतीहून वेगळी नव्हती. उपसभापती अडसड यांनी केलेल्या पाहणीत त्यांना, इमारतीला अनेक ठिकाणी तडे गेल्याचे, इमारतीचे बांध
काम अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याचे आणि इमारतीचा पाया हा जमिनीपासून दुभंगलेला असल्याचे आढळून आले. त्यांनी तात्काळ गटविकास अधिकाºयांना या बांधकामाविषयीच्या चौकशीचे आदेश दिले असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याबाबतही सूचना दिल्या आहेत.सगळा संगनमताचा कारभारशाखा अभियंता, कंत्राटदार आणि तत्कालीन ग्रामसेवक यांच्या संगनमताने हा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ग्रामसदस्य रजनी दखणे, रुपेश काकडे आदींनी केला आहे.