वर्धा - येथील पावडे चौकातील टायरच्या गोदामाला अचानक आग लागली. ही घटना शुक्रवारी सकाळी ७:३० वाजताच्या सुमारास घडली. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाचे १२ बंब प्रयत्न करीत आहे.
टायरच्या गोदामाला सकाळी अचानक आगल लागली. आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वर्ध्यासह हिंगणघाट, पुलगाव, देवळी आदी ठिकाणाहून अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले आहे. अग्निशमन दलाचे जवळपास १४ बंब आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करीत आहे. मात्र, वृत्तलिहस्तोवर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले नाही. टायरच्या धुरामुळे परिसरात सगळीकडे काळोख पसरला आहे. पोलीस, आपत्ती व्यवस्थापनाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहे.
शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीत लाखोंचे टायर जळून खाक झाले आहे. सकाळी काही महिलांना गोदामातून धूर निघताना दिसला. त्यानंतर आगीचे लोळ उठले. दरम्यान, लगतच्या घरातील सर्व सिलींडर बाहेर काढण्यात आले आहे. मात्र, गोदामात काही सिलींडर असल्याची माहिती आहे. त्यामुळे अग्निशमन दलाचे कर्मचारी काळजी घेत आहे.