लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महात्मा गांधीजींमुळे वर्धा जिल्ह्याला ओळख मिळाली. गांधीजी आणि विनोबांचे विचार देश-विदेशात प्रसारीत होत आहे. गांधीजींच्या नावावर स्थापित विश्वविद्यालयातून देश-विदेशातील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून हे विचार जागतिक स्तरावर जात आहे. महात्मा गांधीजींमुळे वर्धा वैश्विक पटलावर आल्याचे मत खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केले.महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात गांधी व शांती अध्ययन विभाग, भारतीय दर्शनीक अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्या संयुक्तवतीने २५ ते २६ रोजी ‘अहिंसा का दर्शन और गांधी’ विषयावर आयोजित राष्ट्रीय चर्चासत्राच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते. कुलगुरू प्रा. रजनीश कुमार शुक्ल म्हणाले, गांधी, विनोबांच्या विचारांनी चालणारा जिल्हा वास्तवात अनेक दृष्टींनी विशिष्ट आहे. सत्य, अहिंसा, अस्तेय व सहिष्णुता या जिल्ह्याची वेगळी ओळख असल्याचे ते म्हणाले. यावेळी भारतीय दार्शनिक अनुसंधान परिषदेचे सदस्य सचिव कुमार रत्नम, डॉ. राकेशकुमार मिश्र, राम सुधार, डॉ. विजय कुमार यांनी विचार व्यक्त केले. राष्ट्रपती रामनाथ कोविन्द, ना. रमेश पोखरियाल, ना. संजय धोत्रे, विश्वविद्यालय अनुदान आयोगाचे अध्यक्ष प्रा. धीरेंद्र पाल सिंह यांच्या संदेशाचे वाचन डॉ. मनोज कुमार राय यांनी केले. संचालन डॉ. जयंत उपाध्याय तर आभार प्रकुलगुरू प्रा. चंद्रकांत रागीत यांनी मानले. याप्रसंगी विविध देशातून आलेले प्रतिनिधी, विद्यार्थी उपस्थित होते.
गांधीजींमुळे वर्धा वैश्विक पटलावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 6:00 AM
महात्मा गांधीजींमुळे वर्धा जिल्ह्याला ओळख मिळाली. गांधीजी आणि विनोबांचे विचार देश-विदेशात प्रसारीत होत आहे. गांधीजींच्या नावावर स्थापित विश्वविद्यालयातून देश-विदेशातील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून हे विचार जागतिक स्तरावर जात आहे. महात्मा गांधीजींमुळे वर्धा वैश्विक पटलावर आल्याचे मत खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केले.
ठळक मुद्देरामदास तडस : ‘अहिंसा का दर्शन’, गांधी विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र