शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
2
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
3
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
6
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
7
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
8
"अपने साथी शहीदों में शामिल...", हिजबुल्लाहकडून नसरल्लाहच्या खात्म्याची पुष्टी; घेतली मोठी शपथ!
9
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
10
हिजबुल्लाहच्या नसरल्लाहचा 'खात्मा'; आता खामेनेईंचं टेनन्शन वाढलं; इस्रायलवर भडकले अन् अंडरग्राउंड झाले!
11
"महालक्ष्मी ब्लॅकमेल करत होती, म्हणून ५९ तुकडे..."; बंगळुरू हत्येतील आरोपीच्या भावाचा मोठा दावा
12
“ठाकरे गटाला महाविकास आघाडीत फक्त ४४ जागा मिळतील”; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
13
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
14
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
15
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
16
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे म्हणून १०१ पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ
17
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
18
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात
19
“...तर शरद पवारांच्या इशाऱ्यावर मनोज जरांगे मराठा आंदोलन करत होते स्पष्ट”: प्रकाश आंबेडकर
20
देशातील टॉप १० श्रीमंत देवस्थानांच्या यादीत राम मंदिर; किती कोटींचे दान मिळाले? आकडा पाहाच

वर्धा गर्भपात प्रकरण : सोनोग्राफीच्या आकडेवारीत मोठी तफावत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2022 11:28 AM

ऑनलाईन संकेतस्थळावर सोनोग्राफी संदर्भात भरलेल्या आकडेवारीत तफावत आढळल्याचे सहा सदस्यीय अभ्यास गट समितीने आपल्या अहवालात नमूद केले आहे.

ठळक मुद्देपाहणीत उलगडले वास्तव : आर्वीच्या कदम हॉस्पिटलमधील प्रकार

महेश सायखेडे

वर्धा : गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदान यंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) कायदा १९९४ सुधारित २००३ आणि वैद्यकीय गर्भपात कायदा १९७१ सुधारित २०२१ अन्वये प्रत्येक सोनोग्राफी केंद्राला प्रत्येक महिन्याला सोनोग्राफी बाबतचा मासिक अहवाल जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयास पाठविणे तसेच शासनाच्या संकेतस्थळावर सोनोग्राफी बाबतची ऑनलाईन माहिती सादर करणे क्रमप्राप्त आहे.

आर्वी येथील अवैध गर्भपात प्रकरणातील आरोपी असलेल्या कदम डॉक्टर दाम्पत्याने त्यांच्या सोनोग्राफी केंद्रातील मासिक अहवाल ऑनलाईन संकेतस्थळावर नियमाला अनुसरून भरला नसल्याचा धक्कादायक प्रकार अभ्यास गट समितीच्या निदर्शनास आला आहे. नोव्हेंबर व डिसेंबर २०२१ या काळातील सादर केलेल्या मासिक अहवालात व ऑनलाईन संकेतस्थळावर सोनोग्राफी संदर्भात भरलेल्या आकडेवारीत तफावत आढळल्याचे सहा सदस्यीय अभ्यास गट समितीने आपल्या अहवालात नमूद केले आहे.

तज्ज्ञ म्हणतात... औषध प्रकरणाच्या चौकशीची गरज ; पण शासन गप्पच

समितीने आपला अहवाल आरोग्य विभागाच्या अतिरिक्त संचालकांमार्फत शासनाला सादर केला आहे. कदम यांच्या खासगी रुग्णालयात शासकीय औषधांचा मोठ्या प्रमाणात साठा सापडल्याने या औषध प्रकरणाची स्वतंत्रपणे सखोल चौकशी करणे गरजेेचे असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. मात्र, राज्य पर्यवेक्षकीय मंडळ, पीसीपीएनडीटीच्या सदस्य डॉ. आशा मिरगे यांनी १८ फेब्रुवारी २०२२ ला अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्याकडे निवेदन सादर करीत औषध प्रकरणाची स्वतंत्रपणे चौकशीची मागणी करूनही अद्याप कुठलीही चौकशी समिती गठित करण्यात आली नसल्याचे वास्तव आहे.

१० जानेवारीला नेमके शिजले तरी काय?

समितीच्या पाहणीत कदम हॉस्पिटलमध्ये २ जानेवारी २०२२ ते ८ जानेवारी २०२२ दरम्यान ७३ ‘एफ फाॅर्म’ आढळले. आरोग्य यंत्रणेतील तज्ज्ञांनी बारकाईने पाहणी केली असता सदर ‘एफ फाॅर्म’सोबत उपजिल्हा रुग्णालय, आर्वी येथून संदर्भित केलेल्या १५ सोनोग्राफी संदर्भ चिठ्ठ्यांवर सोनोग्राफी करण्याचे कारण आढळून आले, तर ५८ संदर्भ चिठ्ठ्यांवर सोनोग्राफी साठीचे कुठलेही कारण नमूद केल्याचे आढळले नाही. इतकेच नव्हे तर, सर्व ७३ ही ‘एफ फाॅर्म’ १० जानेवारी २०२२ रोजी ऑनलाईन भरल्याचे आढळले. शिवाय त्यावर १० जानेवारी २०२२ रोजी डॉ. रेखा कदम यांनी स्वाक्षरी केल्याचे पुढे आले. जेव्हा की तेथे उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांनी डॉ. रेखा कदम यांना १० जानेवारी २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास अटक केल्याचे समितीतील तज्ज्ञांना सांगितले. त्यामुळे १० जानेवारीला नेमके शिजले तरी काय? याची स्वतंत्र सखोल चौकशी करून शोध घेण्याची गरज आहे.

कवट्या अन् हाडांच्या तपासणी अहवालाची प्रतीक्षा

कदम हॉस्पिटल परिसरातील गोबर गॅससारख्या टँकमधील कचरा उपसला असता पोलिसांना तेथे तब्बल ११ मानवी कवट्या तसेच ५४ मानवी हाडे सापडली. ती जप्त करुन नागपूर येथील प्रयोगशाळेत लिंग तपासणीसाठी पाठविली आहेत; परंतु तीन महिन्यांचा कालावधी लोटूनही या मानवी कवट्या आणि हाडांबाबतचा अहवाल आर्वी पोलिसांना मिळालेला नसल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरAbortionगर्भपात