शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

वर्धा गर्भपात पकरण : १० दिवसानंतरही प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान कायद्यांतर्गत चौकशी थंडबस्त्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2022 11:13 AM

प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान (पीसीपीएनडीटी) कमिटीच्या उदासीनतेमुळे या प्रकरणाला १० दिवस उलटूनही अद्याप चौकशी पूर्ण न झाल्याने या कमिटीच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

ठळक मुद्दे४८ तासांत चौकशी पूर्ण करण्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाचे आदेश

चैतन्य जोशी

वर्धा : संपूर्ण देशात खळबळ उडविणाऱ्या आर्वी येथील ‘कदम’ रुग्णालयातील गर्भपात प्रकरणात अवैध गर्भपातासारखे गैरप्रकार रोखण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अध्यक्षतेत समुचित प्राधिकाऱ्यांची वर्धा जिल्ह्यात नियुक्ती करण्यात आली आहे. तक्रार प्राप्त झाल्यानंतर २४ तासांच्या आत चौकशी सुरू करून ४८ तासांत कार्यवाही पूर्ण करून न्यायालयात तक्रार दाखल करण्याचे शासन आदेश असतानाही प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान (पीसीपीएनडीटी) कमिटीच्या उदासीनतेमुळे या प्रकरणाला १० दिवस उलटूनही अद्याप चौकशी पूर्ण न झाल्याने या कमिटीच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

‘कदम’ रुग्णालयाच्या पाठीशी तर ही कमिटी नाही ना, असा संशय येऊ लागला आहे. घटना उजेडात येताच राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ३१ मे २०१७ च्या निर्णयानुसार २४ तासांच्या आत रुग्णालयाची चौकशी करून ४८ तासांच्या आता अंतिम चौकशी अहवाल पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना आहेत. मात्र, असे असतानाही जिल्ह्यात नियुक्त असलेल्या ३९ प्राधिकाऱ्यांना या आदेशाचा विसर पडला की जाणीवपूर्वक चौकशी करण्यास टाळाटाळ केली जात आहे, हा कळीचा मुद्दा आहे.

‘लोकमत’ने आरोग्य यंत्रणेतील काही महत्त्वाच्या मुद्यांवर अभ्यास केला असता त्यात राज्याच्या आरोग्य विभागाने १६ मे २०१७ मध्ये शासन निर्णय काढून पीसीपीएनडीटी ॲक्ट १९९४ अनुसार तक्रार प्राप्त होताच काय कारवाई करावी, याबाबतच्या मार्गदर्शक सूचना मागितल्या असल्याचे दिसून आले.

जिल्हास्तरीय समुचित प्राधिकाऱ्यांवर होणार का कारवाई

शासन निर्णयानुसार वर्धा जिल्ह्यात पीसीपीएनडीटी कमिटीवर समुचित प्राधिकाऱ्यांची नियुक्ती असतानाही चौकशी करण्यास विलंब केला जात आहे. प्राधिकाऱ्यांनी शासन आदेशाचे उल्लंघन केल्याने त्यांच्यावर कारवाई होणार काय, हा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यात वैद्यकीय विभागाबरोबरच महसूल विभागातील कार्यकारी दंडाधिकारी यांनादेखील पीसीपीएनडीटीबाबत अधिकार प्रदान केले आहेत, हे विशेष.

सोनोग्राफी सेंटर सील नाहीच

४८ तासांच्या आत अंतिम अहवाल तयार करून त्यावर आरोपींना कारणे दाखवा नोटीस बजावून पुढील न्यायालयीन कारवाई करणे आवश्यक आहे. पीसीपीएनडीटी कायद्यान्वये फक्त जिल्हास्तरीय कमिटीचे नियुक्त प्राधिकारीच थेट न्यायालयात तक्रार दाखल करू शकतात. सोनोग्राफी सेंटरकडून नियमांचे उल्लंघन झाल्यास सोनोग्राफी सेंटरचा परवाना कलम २० (१), (२), (३) नुसार तत्काळ निलंबित करून तपासणी आणि जप्तीची प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे होते. मात्र, तसे झालेले दिसत नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीhospitalहॉस्पिटलAbortionगर्भपातdoctorडॉक्टरArrestअटक