शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

वर्धा लोकसभा निवडणूक निकाल २०१९; रामदास तडस यांचा दणदणीत विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 10:05 PM

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत कॉँग्रेसच्या दिग्गज उमेदवाराचा पराभव करून भाजप-शिवसेना युतीच्या तिकिटावर विजय मिळविणारे रामदास तडस यांनी पुन्हा २०१९ मध्ये वर्धा लोकसभा मतदारसंघातून विजय संपादन केला आहे.

ठळक मुद्देसर्वच विधानसभा मतदार संघात राहिला भाजपचा बोलबालातडस यांच्या व्यक्तिगत जनसंपर्काला मतदारांची पसंतीगटबाजी व गुडगावचा उमेदवार हेच कॉँग्रेसच्या पराभवाचे मुख्य कारण

लोकमत न्यूज नेटवर्क ।

वर्धा : २

०१४ च्या लोकसभा निवडणुकीत कॉँग्रेसच्या दिग्गज उमेदवाराचा पराभव करून भाजप-शिवसेना युतीच्या तिकिटावर विजय मिळविणारे रामदास तडस यांनी पुन्हा २०१९ मध्ये वर्धा लोकसभा मतदारसंघातून विजय संपादन केला आहे. पाच वर्षांनंतरही या लोकसभा मतदारसंघात मोदी लाट कायम राहिल्याचे चित्र या निकालाने स्पष्ट झाले आहे. मागील पाच वर्षांत रामदास तडस यांनी मतदारांशी व्यक्तिगतस्तरावर ठेवलेला जनसंपर्क, भारतीय जनता पक्षपातळीवरील संघटनेची बांधणी व कार्यकर्त्यांनी घेतलेले परिश्रम, तेवढीच शिवसेनेने ऐनवेळी समर्थपणे दिलेली साथ हेच भाजपच्या विजयाचे मुख्य कारण ठरले.वर्धा : स्थानिक भारतीय खाद्य निगमच्या गोदाम परिसरात सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरूवात झाली. पहिल्या फेरीची मतमोजणी सुरू झाल्यापासून भाजपा उमेदवार विद्यमान खासदार रामदास तडस आघाडी घेऊन होते. पहिल्या फेरीत ७ हजार ८९६ मतांची आघाडी मिळाली.मतमोजणीच्या प्रत्येक फेरीत सहाही विधानसभा क्षेत्राची मतमोजणी करण्यात येत होती. याच मतमोजणीसोबत पोस्टल बॅलेटचीही मोजणी करण्यात आली. पहिल्या फेरीपासून काँग्रेसच्या उमेदवार अ‍ॅड. चारूलता टोकस यांच्यावर तडस यांनी आघाडी मिळाली. पहिल्या फेरीत तडस यांना २३ हजार १५ मते मिळाली. तर चारूलता टोकस यांना १५ हजार १९९ मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड. धनराज वंजारी यांना १ हजार १७६ तर बसपाचे शैलेश अग्रवाल यांना १ हजार ११६ मते मिळाली. दुसऱ्या फेरीतही तडस यांना ४३ हजार ५४८ तर टोकस यांना ३२ हजार ८०२ मते मिळाली. मतमोजणीच्या प्रत्येक फेरीतच तडस काँग्रेस उमेदवार टोकस यांच्यावर आघाडी घेत राहिले. त्यामुळे तडस यांच्या मताधिक्यात वाढ झाल्याचे दिसून येत होते. मतमोजणीच्या स्थळावर १४ टेबल लावण्यात आले होते. मतमोजणीच्या २७ फेºया करण्यात आल्या. काही टेबलवर अतिशय वेगाने काम आटोपण्यात येत होते. त्यामुळे तेथील मतमोजणीचे आकडे लगेच बाहेर पडत होते. मतमोजणीच्या १० फेºया आटोपल्यानंतर भाजप उमेदवार रामदास तडस दुपारी ४.२५ मिनिटांनी मतमोजणीस्थळी पोहोचले. येथे पत्रकारांशी संवाद साधला. त्यांच्या व्यतिरिक्त वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अ‍ॅड. धनराज वंजारी हेसुद्धा मतमोजणीस्थळी उपस्थित होते. भाजपाला वर्धा लोकसभा मतदार संघात मिळालेल्या ऐतिहासिक विजयानंतर शहरातील शिवाजी चौकातून मिरवणूक काढण्यात आली. यात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांसह शिवसेना व मित्र पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी विजयाचा जल्लोष साजरा केला. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकार विराजमान होणार, असे दिसताच जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडले.या निकालाचा ऐतिहासिक संदर्भवर्धा लोकसभा मतदारसंघात १९५१ पासून सलग निवडणुका जिंकणाऱ्यांमध्ये कमलनयन बजाज, वसंत साठे यांचा समावेश आहे. आता २०१९ मध्ये सलग दुसºयांदा विजय मिळविणारे रामदास तडस यांचे नाव जोडल्या गेले आहे. कमलनयन बजाज यांनी १९५७, १९६२ व १९६७ मध्ये लोकसभेच्या निवडणुका जिंकल्या तर माजी केंद्रीय मंत्री दिवंगत वसंत साठे यांनी १९८०, १९८४ व १९८९ मध्ये सलग निवडणुका जिंकल्या.त्यानंतर २०१४ मध्ये रामदास चंद्रभान तडस हे भाजपकडून निवडून आले व आता पुन्हा २०१९ मध्ये मतदारांनी त्यांना संधी दिली आहे. तसेच वर्धा लोकसभा मतदारसंघातून कॉँग्रेसच्या तिकिटावर दत्ता मेघेही दोनदा निवडून आले आहेत. मेघे यांनी १९९८ मध्ये पहिली निवडणूक जिंकली. त्यानंतर २००९ मध्ये दत्ता मेघे पुन्हा निवडून आले. मात्र, या मतदारसंघातून सलग निवडणूक जिंकणारे तडस हे तिसरे खासदार आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालwardha-pcवर्धा