महेश सायखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : स्वच्छ सर्वेक्षण २०१८ या स्पर्धेत स्थानिक नगर पालिकेने सहभाग घेतला आहे. गुरूवारी वर्धा नगर परिषदेने अनेकांना मागे टाकून ‘मिस कॉल सिटीझन फिडबॅक’मध्ये १८ वे स्थान प्राप्त केले आहे. बुधवारी वर्धा नगर पालिका ४० व्या स्थानावर होती. अवघ्या २४ तासांतच वर्धा नगर िपरिषदेने १८ वे स्थान प्राप्त करीत चुणूक दाखविली आहे.स्वच्छ सर्वेक्षणात नागरिकांचाही सहभाग वाढावा तसेच नागरिकांना स्वच्छतचे महत्त्व पटावे या हेतूने १९६९ हा ‘टोल फ्री’ क्रमांक सुरू करण्यात आला आहे. या क्रमांकावर ‘मिस कॉल’ देऊन, शिवाय बेवसाईटच्या माध्यमातून नागरिकांना आपले मत नोंदविता येते. वर्धा शहरात स्वच्छ सर्वेक्षणाच्या माध्यमातून पालिकेद्वारे एक-एक व्यक्ती जोडला जात आहे. सदर सर्वेक्षण केवळ सर्वेक्षण न राहता ती लोकचळवळ कशी बनविता येईल, यासाठी प्रयत्न केले जात आहेत.१९६९ या टोल फ्री क्रमांकावर कॉल केला असता लवकरच आपल्याशी संपर्क करून तुमचे मत जाणून घेतले जाईल, असे सांगितले जाते. यानंतर अवघ्या काही मिनीटांतच मिस कॉल देणाऱ्यांच्या भ्रमणध्वनीवर परत कॉल येतो. यात त्यांना सुमारे सहा प्रश्न विचारत त्यांचे मत जाणून घेतले जाते. स्वच्छ भारताचे उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात घेतल्या जाणाºया स्वच्छ सर्वेक्षण २०१८ या स्पर्धेचा ‘मिस कॉल सिटीझन फिडबॅक’ हा एक भाग आहे.बुधवारी या मिस कॉल सिटीझन फिडबॅकमध्ये वर्धा ४० व्या स्थानावर होते. गुरूवारी मात्र वर्धा नगर पालिकेने यात १८ वे स्थान प्राप्त केले आहे.दोन हजार स्वच्छता दूत तयार करण्याचा मानसवर्धा शहरातून अस्वच्छता कायम हद्दपार करता यावी म्हणून शहरातील प्रत्येक घरात एक स्वच्छता दूत तयार व्हावा. यासाठी वर्धा न.प. प्रशासन सध्या प्रयत्न करीत आहे. वर्धा नगर परिषदेच्या स्वच्छता विभागातील सफाई कामगार वगळता शहरातील सुमारे दोन हजार युवक स्वच्छता दूत म्हणून कसे पूढे येतील, यासाठी नगराध्यक्ष अतुल तराळे, न.प. उपाध्यक्ष प्रदीप ठाकूर, न.प. आरोग्य सभापती गुंजन मिसाळ, न.प. मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे यांच्यासह नगर परिषदेच्या स्वच्छता तथा आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचारी प्रयत्न करीत आहेत.वर्धा शहरातून अस्वच्छतेला हद्दपार करण्यासाठी सुमारे दोन हजार स्वच्छता दूत तयार करण्याचा मानस नगरपालिका प्रशासनाचा आहे. स्वच्छतेबाबत पालिकेच्यावतीने आयोजित करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांत नागरिकांनी सहभागी व्हावे.- अश्निवी वाघमळे, मुख्याधिकारी, न.प., वर्धा.वर्धा शहर स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी पालिकेकडून प्रयत्न सुरू आहेत. पालिकेचे सफाई कर्मचारी आपले काम नित्यनेमाने करीत असले तरी स्वच्छतेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती गरजेची आहे. प्रत्येक घरातील एक तरुण वा तरुणी स्वच्छता दूत म्हणून पूढे आल्यास वर्धा १०० टक्के स्वच्छ शहर होईल. लोकसहभागाशिवाय कुठलाही उपक्रम यशस्वी होत नाही. वर्धा न.प. चा स्वच्छता दूत होण्यासाठी तरुण-तरुणींनी पूढे यावे.- अतुल तराळे, नगराध्यक्ष, वर्धा.
२४ तासांत वर्धा १८ व्या स्थानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 11:36 PM
स्वच्छ सर्वेक्षण २०१८ या स्पर्धेत स्थानिक नगर पालिकेने सहभाग घेतला आहे. गुरूवारी वर्धा नगर परिषदेने अनेकांना मागे टाकून ‘मिस कॉल सिटीझन फिडबॅक’मध्ये १८ वे स्थान प्राप्त केले आहे. बुधवारी वर्धा नगर पालिका ४० व्या स्थानावर होती.
ठळक मुद्देमिस कॉल सिटीझन फिडबॅक : स्वच्छ सर्वेक्षण, २६० न.प., मनपाचा समावेश