शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
3
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
4
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
5
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
6
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
7
डायलॉग, टाळ्या, शिट्ट्या आणि पैसा वसूल! कसा आहे शरद केळकरचा ‘रानटी’? वाचा Review
8
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
9
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
10
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
11
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
12
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
13
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
14
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
15
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
16
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
17
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
18
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
19
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
20
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन

वर्धा- माजी सैनिकाच्या अवमानाचा निषेध, नगर परिषदेसमोर धरणं आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2018 2:50 PM

सेवानिवृत्त कर्नल चित्तरंजन चवडे यांना वर्धा न. प. तील एका कर्मचाऱ्याने अपमानास्पद वागणूक दिली.

ठळक मुद्देसेवानिवृत्त कर्नल चित्तरंजन चवडे यांना वर्धा न. प. तील एका कर्मचाऱ्याने अपमानास्पद वागणूक दिली. घटनेच्या निषेधार्थ सोमवारी भारतीय माजी सैनिक संघाच्यावतीने स्थानिक न.प.च्या कार्यालयासमोर धरणे देत निषेध नोंदविण्यात आला.

वर्धा : येथील सेवानिवृत्त कर्नल चित्तरंजन चवडे यांना वर्धा न. प. तील एका कर्मचाऱ्याने अपमानास्पद वागणूक दिली. या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी भारतीय माजी सैनिक संघाच्यावतीने स्थानिक न.प.च्या कार्यालयासमोर धरणे देत निषेध नोंदविण्यात आला. आंदोलनादरम्यान मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे यांच्याशी झालेल्या सकारात्मक चर्चेअंती आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले. माजी सैनिकाला अपमानास्पद वागणूक देणाऱ्या न.प. कर्मचाऱ्यावर प्रकरणाची चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी व माजी सैनिकांचा अपमान होणे ही निंदनिय बाब असून न.प.च्या मुख्याधिकाºयांनी माजी सैनिकांची जाहीर माफी मागावी या मुख्य मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले होते. सकाळी ११ वाजता माजी सैनिकांनी वर्धा नगर परिषदेच्या कार्यालयावर धडक देत न.प. प्रशासनाच्या माजी सैनिक विरोधी धोरणांचा निषेध नोंदविला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी न.प. प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. आंदोलनाची माहिती मिळताच शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत मदने यांनी आपल्या चमुसह न.प. कार्यालय गाठले. यावेळी पोलीस कर्मचाºयांनी आंदोलनकर्त्यांची चर्चा केली. मात्र, आंदोलनकर्ते मुख्याधिकाऱ्यांची भेटून चर्चा केल्याशिवाय जाणार नाही यावर ठाम राहिले. त्यानंतर ११.३० वाजताच्या सुमारास आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळासोबत मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे यांनी चर्चा केली. यावेळी त्यांनी आंदोलनकर्त्यांच्या मागण्या जाणून घेत घडलेल्या प्रकार निंदनिय असल्याचे मान्य करीत न.प. प्रशासनाच्यावतीने माजी कर्नल चिंत्तरंजन चवडे यांच्यासह सर्व माजी सैनिकांची जाहीर माफी मागीतली. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले. आंदोलनात माजी कर्नल चित्तरंजन चवडे, माजी सैनिक श्याम परसोडकर, प्रहारचे शहर अध्यक्ष विकास दांडगे यांच्यासह मोठ्या संख्येने माजी सैनिक व वीर माता, पत्नी सहभागी झाल्या होत्या.