ठळक मुद्देविविध संघटनांनी केली मागणी
लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: शासकीय विभागांमधील खासगीकरण थांबविण्यात यावे यासह अनेक मागण्यांसाठी विविध कामगार व कर्मचारी संघटनांनी एकत्र येत बुधवारी मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. तसेच जुनी पेंशन योजना लागू करावी या व अन्य मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविण्यात आले. सदर मोर्चात महसूल, आरोग्य, शिक्षण यांच्यासह शासनाच्या विविध विभागांचे कंत्राटी तसेच शासकीय कर्मचारी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चा दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता.