शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

लसीकरणात राज्यातील पहिल्या पाच जिल्ह्यात वर्ध्याला स्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2020 2:50 PM

Wardha News health कोरोनाकाळातही महत्त्वाच्या लसीकरणालाही प्राधान्य देत लसीकरण मोहिमेत वर्धा जिल्ह्याने राज्यात पहिल्या पाचमध्ये स्थान मिळविले आहे.

ठळक मुद्दे४७.२५ टक्के लसीकरण कोरोनाकाळातही नित्य आरोग्यसेवा कायमच

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होताच आरोग्य यंत्रणा अ‍ॅक्शन मोडवर कामाला लागली असून आजही अविरत आरोग्य सेवा कायम आहे. कोरोनाला रोखण्याकरिता यंत्रणेवर ताण असताना इतर महत्त्वाच्या लसीकरणाकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता निर्माण झाली होती. पण, कोरोनाकाळातही महत्त्वाच्या लसीकरणालाही प्राधान्य देत लसीकरण मोहिमेत वर्धा जिल्ह्याने राज्यात पहिल्या पाचमध्ये स्थान मिळविले आहे.

कोरोनाने राज्यात हाहाकार माजविला असताना मार्च महिन्यात सर्व लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. लागलीच जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणाही कामाला लागल्याने जिल्ह्यात तब्बल दीड महिन्यापर्यंत कोरोना वेशीवरच रोखले. त्यानंतर मात्र कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर आरोग्य विभागाने दिवसरात्र आरोग्यसेवेचे व्रत अविरत चालू ठेवले. रुग्ण मिळाल्यानंतर त्याच्या संपकार्तील व्यक्तींचा शोध घेण्यापासून तर कोविड सेटरमध्ये दाखल करुन उपचार करण्यापर्यंतची जबाबदारी आरोग्य यंत्रणेवर आली. यासोबतच इतर आजारावर उपचार करण्याचेही काम असल्याने मोठा ताण पडला होता. तरीही आरोग्य यंत्रणेने कोरोनासोबतच महत्वाच्या लसीकरणावरही लक्ष केंद्रीत करुन जिल्ह्यातील आठही तालुक्यात ४७.२५ टक्के लसीकरणाचे काम पूर्ण केले आहे.

आपत्तीकाळातील या धावपळीत लसीकरणावर परिणाम झाला असला तरीही केलेले काम हे कौतुकास्पदच ठरत आहे.मिळालेल्या आकडेवारीवरुन लसीकरण मोहिमेत वर्धा राज्यातील पहिल्या पाच जिल्ह्यामध्ये आणण्यात आरोग्य विभाग यशस्वी झाला आहे.रजेविना जोपासत आहेत सेवाव्रतजिल्ह्यात मार्च महिन्यापासून आजपर्यंतही आरोग्य यंत्रणा कोरोनासह इतर उपाययोजना राबविण्यात व्यस्त आहेत. यंत्रणेच्या कर्तव्यदक्षतेमुळे जिल्ह्यात कोरोनावर मात करण्यात यश आले आहे. तरीही आता माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहीम राबविण्यासाठी घरोघरी जात आहे. बहूतांश अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या कालावधीत एकही रजा न घेता सामाजिक दायित्व जोपासत आहे.

कोविड काळात आरोग्य कर्मचारी सातत्याने कार्यरत आहे. या काळातही इतरही आजारांवर उपचार केले जात आहे. यादरम्यान लसीकरण मोहीम राबविण्यात आली असून राज्यात पहिल्या पाचमध्ये वध्यार्चा समावेश आहे. प्रत्येक महिन्याचे लसीकरणाचे आकडे वेगवेगळे असतात. इतर बाबी सांभाळून कर्मचारी लसीकरणाचे काम करीत आहेत.डॉ. अजय डवले, जिल्हा आरोग्य अधिकारी

टॅग्स :Healthआरोग्य