लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: आर्वी तालुक्यातील वर्धा जिल्हयाच्या शेवटच्या सीमेवरील देऊरवाडा /कौंडण्यपूर पुलावरून वर्धा नदीचे पाणी पुलावरून आणि दुथडी भरून वाहू लागले आहे. त्यामुळे आर्वी अमरावती मार्ग बंद करण्यात आला असून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
आर्वी परिसरात मागील छत्तीस तासांपासून पाऊस सुरू आहे. या वर्धा नदीचे वरील बाजूला अप्पर वर्धा धरण (नलदमयंती) तर खालील बाजूला निम्न वर्धा धरण (बगाजी सागर) धरण आहे. अप्पर वर्धा धरणात जमा झालेले पाणी या वर्धा नदीपात्रात सोडले जाते. सध्या अप्पर वर्धाच्या तेरा दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे तर आर्वी तालुक्यातील अप्पर वर्धा धरणातून 33 दरवाजातुन पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
देउरवाड़ा/ कौंडण्यपूर येथे मोठ्या प्रमाणात वर्धा नदीचे बॅकवॉटर जमा होते. त्यामुळे या नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या वर्धा नदीवरील आर्वी ते अमरावती मार्गचे आवागमन पुरामुळे बंद झाले आहे.