शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
2
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
3
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
4
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
5
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
6
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
7
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
8
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

जलयुक्त शिवारच्या अंमलबजावणीत वर्धा जिल्हा विभागात अव्वल

By admin | Published: September 21, 2016 1:06 AM

पावसाच्या पाण्यावरील शेतकऱ्यांचे अवलंबित्व कमी करून शेत-शिवारात जलसाठे निर्माण व्हावेत या उद्देशाने राज्य शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या

३७ हजार दशलक्ष घनमीटर पाणीसाठा निर्मितीवर्धा : पावसाच्या पाण्यावरील शेतकऱ्यांचे अवलंबित्व कमी करून शेत-शिवारात जलसाठे निर्माण व्हावेत या उद्देशाने राज्य शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या जलयुक्त शिवारच्या अंमलबजावणीत वर्धा जिल्हा आघाडीवर आहे. नागपूर विभागातील सहांपैकी सर्वाधिक पाणी साठवण क्षमता वर्धा जिल्ह्यात निर्माण झाली. जलयुक्त शिवार अभियानामुळे २५ हजार हेक्टर संरक्षित सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली आहे.जिल्ह्यात ४ लाख ४८ हजार २८५ हेक्टर क्षेत्रावर यावर्षी खरीपाची लागवड झाली आहे. त्यामध्ये केवळ २७ टक्के क्षेत्र सिंचनाखाली असून उर्वरित ७३ टक्के क्षेत्र कोरडवाहू आहे. त्यामुळे पावसाची अनियमितता आणि शेतीची उत्पादकता यांचा थेट संबंध आपल्या जिल्ह्यात पहायला मिळतो. यावर्षी सुद्धा शेतकऱ्यांना हा अनुभव आलाच. ज्या गावांमध्ये जलयुक्त शिवारची कामे झालीत, तेथील शेतकऱ्यांना तिथे साचलेल्या पाण्याने तारले. आॅगस्ट महिन्यात पावसाने महिनाभर खंड दिला. पिके कोमेजायला लागतील तेव्हा सिमेंट बंधारा, शेततळे नाल्यातील पाण्यामुळे पिकांना नवसंजिवनी मिळाली.जलयुक्त शिवार अभियानात २०१५-१६ मध्ये २१४ गावांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी ११५ गावांमध्ये १०० टक्के काम पूर्ण झाले आहे तर ४४ गावांमध्ये ८० टक्के पेक्षा जास्त काम झाले आहे. या १५९ गावांमधील शेतकऱ्यांनी खंड काळात नाल्यामध्ये व सिमेंट बंधाऱ्यामुळे साठलेल्या पाण्याचा उपयोग ओलीत करून पिके वाचविण्यासाठी केला.यावर्षी जिल्ह्यातील किमान २५ हजार हेक्टरवरील शेतकऱ्यांना तरी पावसाच्या लहरीपणाचा फटका बसणार नाही. याशिवाय नाला खोलीकरण आणि सिमेंट नाला बांधमुळे विहिरीच्या पाणी पातळीत दीड ते दोन मिटरने वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. याचा थेट फायदा शेतकऱ्यांना पावसाच्या खंड काळात तसेच रब्बी पिकासाठी होणार आहे.(प्रतिनिधी)३,२०६ पैकी २,८९६ कामे पूर्ण गतवर्षी २१४ गावांमध्ये ३,२०६ कामे घेण्यात आली होती. यापैकी २,८९६ कामे पूर्ण झाली आहेत. या सर्व कामांमुळे जिल्ह्यात ३७ हजार ४५९ दशलक्ष घनमीटर पाणीसाठी निर्माण झाला आहे. या पाण्याचा उपयोग कापूस पिकासाठी एकदा पाणी दिल्यास २४ हजार ९७२ हेक्टर क्षेत्रात सिंचन होवू शकते. तर दोनदा पाणी वापरल्यास १२ हजार ४८६ हेक्टर सिंचन होवू शकते.