शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

वर्धा जिल्ह्यातील मागासवर्गीय महिलांना योजनेच्या नावावर ठेंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 1:08 PM

जिल्हा परिषद प्रशासनाने शासनाच्या या निर्णयाला बगल देत या सबबीखाली असलेल्या निधीत कपात केली. परिणामी ठेवलेल्या तोकड्या निधीत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभापासून मागासवर्गीय महिला वंचित राहिल्या.

ठळक मुद्देशासकीय योजनांच्या निधीतूनच दाखविला खर्च  विद्यार्थ्यांकरिता समाज कल्याण व महिला बाल कल्याण विभागाच्यावतीने अनेक योजना राबविण्यात येतात. या योजनेत झालेला खर्चच या योजनेतून केल्याची जिल्हा परिषदेने दर्शविल्याचा ठपका लेखा परिक्षण अहवालात ठेवण्यात आला आहे. या

रूपेश खैरी।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्हा परिषदेच्या सेस फंडातील २० टक्के निधीतून ३० टक्के वाटा समाजकल्याण विभागामार्फत मागासवर्गीय महिलांसाठी विशेष योजना राबविण्याकरिता राखीव ठेवणे अनिवार्य आहे. तसे शासनाचे आदेश आहेत. असे असताना जिल्हा परिषद प्रशासनाने शासनाच्या या निर्णयाला बगल देत या सबबीखाली असलेल्या निधीत कपात केली. परिणामी ठेवलेल्या तोकड्या निधीत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभापासून मागासवर्गीय महिला वंचित राहिल्या.महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या निर्णयानुसार २० टक्के सेस फंड निधीतून मागासवर्गीय महिलांसाठी ३० टक्के निधी खर्च करण्यात यावे असे आदेश आहे. सदर वर्षात या निकषानुसार जिल्हा परिषद प्रशासनाने २ कोटी ४२ लाख ३५ हजार १०० इतक्या रकमेतून ७२ लाख ७० हजार ५३० रुपये तरतूद करणे आवश्यक होते. मात्र जिल्हा परिषदेने या योजना राबविण्याकरिता केवळ ३० लाख रुपयांची तरतूद केली. शासन निर्णयाला बगल देत तब्बल ४२ लाख ७९ हजार ५३० रुपयांची कपात केली. शिवाय तरतुद केलेल्या रक्कमेतून कुठलीही योजना राबविण्यात आली नाही. यामुळे सदर निधी जिल्हा परिषदेत अखर्चीत राहिला असून यासंदर्भात कारवाई करण्याच्या सूचना लेखापरिक्षण अहवालात देण्यात आल्या.जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण समिती व समाज कल्याण विभाग यांनी मागासवर्गीयांच्या कल्याणकारी योजना आखून त्यांची परिणामकारक अंमलबजावणी करावी व २० टक्के रक्कम त्याच वर्षी खर्ची पडेल याची दक्षता घ्यावी. सर्व बाबीपासूनच्या उत्पन्नाची २० टक्के रक्कम ही मागासवर्गीयांच्या कल्याणकारी योजनांवर योग्य तºहेने व त्याच आर्थिक वर्षात खर्च होते की नाही हे पाहण्याची जबाबदारी संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व समाज कल्याण अधिकारी यांची असून रक्कम खर्ची न पडल्यास त्यांना जबाबदार धरल्या जाईल असे नमूद आहे.वर्धा जिल्हा परिषदेत हा निधी खर्च करण्यात आला नसल्याने याची चौकशी करण्याची गरज निर्माण झाली आहे. सन २०१६-१७ या काळात जिल्हा परिषद प्रशासनावर असलेल्या सत्ताधारी आणि अधिकाऱ्यांनी शासनाच्या या निर्णयाला बगल देत काम केल्याचा ठपका लेखापरिक्षण अहवालातून ठेवण्यात आला आहे.

अखर्चीत निधीकडे नव्या सत्रातही दुर्लक्षचच्जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून मागासवर्गीयांच्या कल्याणकारी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी व योजनांमधील मुळ उद्देश सफल व्हावा याकरिता जि.प. ने स्वउत्पन्नातील २० टक्के प्रमाणे राखून ठेवलेला निधी खर्च करणे अपेक्षीत आहे. सन २०१६-१७ मध्ये या योजनेच्या नावाखाली ठेवलेला निधी सन २०१७-१८ मध्ये खर्च करण्याची कार्यवाही संबंधीत विभागाने करावी, अशा सूचना लेखा परिक्षण अहवालात दिल्या आहेत. असे असतानाही या सूचनांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे. 

शासनाने दिलेल्या निकषानुसार निधीचे नियोजन करणे अनिवार्य आहे.

अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारण्यापूर्वी जर शासकीय निकषांना डावलून जर काम झाले असेल तर त्याची चौकशी करण्यात येईल. दिव्यांगांकरिता असलेल्या ३ टक्के निधीसंदर्भात विचार केल्यास त्यांच्याकडून अर्ज येण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे हा निधी खर्च करणे अवघड जात आहे. योजना आहेत, निधीही आहे; पण त्याकडे विभागाचे दुर्लक्ष असल्याचे दिसते. या संदर्भात चौकशी करण्यात येईल.- नितीन मडावी, अध्यक्ष, जिल्हा परिषद,वर्धा

दिव्यांगांकरिता असलेले १७.७९ लाखही अखर्चितमहाराष्ट्र शासन ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या निर्णयानुसार मागासवर्गीयांसाठी राखून ठेवणाऱ्या २० टक्के निधीतून ३ टक्के रक्कम प्रवर्गनिहाय प्राधान्याने दिव्यांगांकरिता राबविण्यात येणाऱ्या योजनांवर खर्च करणे आवश्यक आहे. त्यानुसार अंदाज पत्रकात दिव्यांगांकरिता राबविण्यात येणाऱ्या योजनांवर १७ लाख ७९ हजार रुपये खर्च करण्याची तरतूद जिल्हा परिषदेने अंदाजपत्रकात केली. मात्र या तरतुदीनुासर २०१६-१७ या वर्षात दिव्यांगांसाठी असलेल्या तरतुदींपैकी एकही रुपया खर्च केला नाही. परिणामी विविध योजनांच्या लाभापासून दिव्यांगांना वंचित रहावे लागले.

टॅग्स :zpजिल्हा परिषद