शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

वर्धा-यवतमाळ-नांदेड मार्ग: नव्या वर्षात कळंबपर्यंत धावणार रेल्वे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2023 10:54 AM

पंतप्रधान कार्यालयातील प्रगती पोर्टलवर समाविष्ट : प्रकल्पाच्या कामाला वेग

वर्धा : विदर्भ-मराठवाडा हे दोन्ही प्रदेश जोडण्याच्या प्रक्रियेत वरदान ठरणाऱ्या वर्धा-यवतमाळ-नांदेड या २८४ किलाेमीटरच्या बहुप्रतीक्षित रेल्वे मार्गाचे काम प्रगतीपथावर असून जानेवारी २०२४ पर्यंत वर्धा ते कळंबपर्यंत रेल्वेगाडी धावणार असल्याचे सूतोवाच रेल्वेच्या सूत्रांनी केले आहे. दरम्यान या मार्गाच्या विकासकामाला गती देण्यासाठी हा रेल्वेमार्ग पंतप्रधान कार्यालयातील प्रगती पोर्टलवर समाविष्ट करण्यात आला आहे.

वर्धा- यवतमाळ-नांदेड या रेल्वे मार्गाच्या कामाला केंद्र सरकारने लालूप्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना लोकमत वृतपत्र समूहाचे अध्यक्ष, राज्यसभेचे तत्कालीन खासदार डाॅ. विजय दर्डा यांच्या पाठपुराव्यामुळे मंजुरी दिली होती. वर्धा- यवतमाळ - नांदेड रेल्वे प्रकल्प पंतप्रधान कार्यालयातील प्रगती पोर्टलवर समाविष्ट झाल्याने या प्रकल्पाच्या कामाला वेग आला आहे. वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे प्रकल्प दोन टप्प्यांत आहे. पहिला वर्धा ते यवतमाळ ७८ किलोमीटर, तर दुसरा टप्पा यवतमाळ ते नांदेड २०६ किलोमीटरचा आहे. एकूण रेल्वे मार्ग २८४ किमी अंतराचा असून साडेतीन हजार कोटी खर्चातून तो पूर्णत्वास जात आहे. वर्धा जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यातील वर्धा ते कळंब ४० किलोमीटर आणि कळंब ते यवतमाळ ३८ किलोमीटर तसेच वर्धा ते यवतमाळ या पहिल्या टप्प्याचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे.

यवतमाळ ते नांदेड रेल्वेमार्गाच्या सिंगल लाइनचे काम प्रगतिपथावर असून, या मार्गावर १५ मोठे ब्रीज, २९ बोगदे, तसेच ५ उड्डाणपुलांचे बांधकाम सुरू आहे. या मार्गावर वर्धा ते कळंबपर्यंत ४० किमी अंतराच्या रेल्वेचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. सोबतच देवळी रेल्वे स्टेशनच्या सुसज्ज वास्तूंचे बांधकाम पूर्ण झाले असून, प्लॅटफॉर्मचे बांधकाम, तसेच इतर कामे अंतिम टप्प्यात आहेत. त्यामुळेच येत्या जानेवारीपर्यंत वर्धा-देवळी ते कळंब मार्गावर रेल्वे धावणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

ऑक्टोबर /नोंव्हेबर २०२३ मध्ये रेल्वे गाडीची ट्रायल सुरू होणार असून प्रत्यक्ष वर्धा ते कळंब या सेक्शनचे उद्घाटन जानेवारी २०२४ मध्ये प्रस्तावित आहे. या प्रकल्पामुळे देवळी शहर व वर्धा जिल्ह्यातील भिडी हे ग्रामपंचायत असलेले गाव भारतीय रेल्वेच्या नकाशावर प्रथमच येणार आहे.

विजय दर्डा यांच्या निरंतर प्रयत्नांचे यश

विदर्भ व मराठवाडा या महाराष्ट्रातील दोन मागास भागांसाठी संजीवनी ठरणारा वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे प्रकल्प लोकमत समूहाच्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन व माजी खासदार डॉ. विजय दर्डा यांचा 'ड्रीम प्रोजेक्ट' राहिला आहे. या प्रकल्पासाठी ते गेल्या तीन दशकांपासून निरंतर प्रयत्न करत आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळे फेब्रुवारी २००८ मध्ये या प्रकल्पाची घोषणा केली गेली. फेब्रुवारी २००९ मध्ये तत्कालीन रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव यांनी यवतमाळात या प्रकल्पाचे भूमिपूजन केले होते. खासदारपदी असताना त्यांनी संसदेत या प्रकल्पाची मागणी लावून धरली, शिवाय केंद्र व राज्य सरकारकडे सतत पाठपुरावा केला. काही महिन्यांपूर्वी दर्डा यांनी या प्रकल्पाच्या संथगतीने सुरु असलेल्या कामासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. तसेच न त्यांच्यासोबत पत्रव्यवहारही केला होता. यानंतर विद्यमान रेल्वेमंत्री अश्विनी च वैष्णव यांच्यासोबतही चर्चा केली होती. यावेळी वैष्णव यांनी हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते.

मालधक्कादेखील मंजूर

या कामाबद्दल मी समाधानी असून देवळी येथे एमआयडीसीची मागणी लक्षात घेता मालधक्कादेखील मंजूर केलेला आहे अशी माहिती वर्धेचे खासदार रामदास तडस यांनी ‘लोकमत’ला दिली. वर्धा ते नांदेड हा प्रवासदेखील भविष्यात रेल्वेद्वारे तीन ते चार तासात करता येणार असल्याचे त्यांनी सांगितले. वर्धा-यवतमाळ-नांदेडसह इतर रेल्वे मार्गाला १६ हजार कोटीपेक्षा अधिक निधी देण्यात आला असल्याची माहिती रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली.

टॅग्स :railwayरेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वेwardha-acवर्धाYavatmalयवतमाळNandedनांदेड