ऑनलाइन लोकमत
वर्धा, दि. 30 - वर्धा जिल्ह्याचा बारावीचा निकाल ८५.२७ टक्के लागला आहे. जिल्ह्यातून १८ हजार ४८२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १८ हजार ४६८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ८६६ विद्यार्थी प्राविण्यासह उत्तीर्ण झाले. ४ हजार ३६५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ९ हजार ३४४ द्वितीय श्रेणीत, १ हजार १७२ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे.
एकूण १५ हजार ७४७ विद्यार्थी विद्यार्थ्यांनी जिल्ह्यातून उत्तीर्ण झालेत. त्यांची टक्केवारी ८५.२७ टक्के आहे. विज्ञान शाखेत ६ हजार ४३६ विद्यार्थ्यांपैकी ६ हजार १९२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांची टक्केवारी ९६.२१, कला शाखेत ८ हजार २१८ विद्यार्थ्यांनी ६ हजार १९६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांची टक्केवारी ७५.४० टक्के आहे. वाणिज्य शाखेत २ हजार ४४१ विद्यार्थ्यांपैकी २ हजार १९५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांची टक्केवारी ८९.९२ टक्के आहे. किमान कौशल्यावर आधारीत (एम.सी.व्ही.सी.) अभ्यासक्रमात १ हजार ३७३ विद्यार्थ्यांपैकी १ हजार १६४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांची टक्केवारी ८४.७८ आहे.
पुर्नपरीक्षार्थ्यांची निकाल ३३.३६ टक्के
वर्धा जिल्ह्यातून १ हजार २७२ विद्यार्थ्यांनी पुर्नपरीक्षार्थी म्हणून नामांकन दाखल केले होते. त्यापैकी १ हजार २६५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ४२२ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. त्यांची टक्केवारी ३३.३६ टक्के आहे. विज्ञान शाखेत १५१ विद्यार्थ्यांपैकी १२८ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. कला शाखेत ८२७ विद्यार्थ्यांपैकी २३६ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. त्यांची टक्केवारी २८.५४ टक्के आहेत. वाणिज्य शाखेत ९८ विद्यार्थ्यांपैकी ३४ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. त्यांची टक्केवारी ३४.६९ आहेत. तर व्यवसायिक अभ्यासक्रमात ८९ पैकी २४ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. त्यांची टक्केवारी २६.९७ आहेत.
वर्धा - ८५.७६ टक्के
आर्वी - ८४.२५ टक्के
आष्टी - ९४.३७ टक्के
देवळी - ८७.०९ टक्के
हिंगणघाट- ८८.५२ टक्के
कारंजा - ७६.३४ टक्के
समुद्रपूर - ७८.५० टक्के