लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: हिंगणघाट तालुक्यात कोविडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता तालुका पक्षी व तालुका सर्पासाठी होणाऱ्या निवडणुकीला मुदतवाढ देण्यात येऊन ती २८ फेब्रुवारीपर्यंत करण्यात आली आहे.
निसर्गसाथी फाउंडेशन मागील काही वर्षांपासून निसर्ग संवर्धनाचे कार्य करीत आहे. दिवसेंदिवस पर्यावरणाचा ºहास होत आहे याला पायबंद घालण्यासाठी पशु, पक्षी आदींचे संवर्धन होणे व सर्प आणि पक्ष्यांबद्दल जनजागृती करण्यासाठी तालुका पक्षी व सर्प डिजीटल निवडणुकीचे आयोजन ११ ते १५ फेब्रुवारी २१ दरम्यान केले होते. मात्र तालुक्यात कोविडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रचारात येणाऱ्या मर्यादेचा विचार करूनफाउंडेशनने २८ फेब्रुवारीपर्यंत मतदान करता येणार असल्याचे कळविले आहे.
राज्यात काही मोजक्या जिल्ह्यात शहर पक्षी निवडले गेले असले तरी हिंगणघाट तालुक्यात पहिल्यांदाच तालुका पक्षी निवडला जाणार आहे. तसेच देशासह राज्यात अन्य कुठेही तालुका सर्प आजतागायत निवडला गेला नाही. मात्र निसर्ग साथी फाऊंडेशनच्या पुढाकाराने राज्यात पहिल्यांदाच तालुका सर्प निवडला जाणार आहे.तालुक्यातील नागरिक, शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विविध व्हाटसअप, टेलीग्राम, फेसबुकच्या माध्यमातून https://forms.gle/JuBUBhkRsakH5sxmb ही लिंक दि११ फेब्रुवारी रोज गुरूवार सकाळी ७ वाजेपासून दि २८फेब्रुवारीच्या सायंकाळी ५ वाजे पर्यंत नागरीकांना मतदान करण्यासाठी लिंक ओपन राहील. यात ठिपक्याचा पिंगळा, कोतवाल, चिमणी, शिक्रा, कावळा, गायबगळा या सहा पक्षी उमेदवारांचा तर अजगर , धामण, धोंड्या, तस्कर, कवड्या अशा पाच सर्प उमेदवाराचा समावेश आहे.