लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नवरात्र उत्सवा दरम्यान परिसरात शांतता व सुव्यवस्था कायम राहवी या हेतूने पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने हिंगणी शिवारात छापा टाकून वॉश आऊट मोहीम राबविली. या मोहिमेत पोलिसांनी गावठीदारूसह दारूगाळण्याचे साहित्य असा १.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त करून तीन दारूविक्रत्यांविरुद्ध सेलू पोलिसात दारूबंदीच्या कलमान्वये गुन्हे दाखल केले आहे.हिंगणी शिवारात नदीच्या काठावर गावठी दारू गाळली जात असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाला मिळाली. त्या आधारे पोलिसांनी हिंगणी शिवारात छापा टाकून मोठ्या प्रमाणात गावठी दारू, कच्चा मोह रसायन सडवा, उकळता मोह रसायन सडवा व दारूगाळण्याचे साहित्य असा एकूण १ लाख ३२ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदर कारवाई दरम्यान पोलिसांनी दारूविक्रेता राजन सावजी बोदलखंडे, हरीचंद्र विठोबा मसराम व कैलास रामदास मोहर्ले सर्व रा. सेलू यांच्याविरुद्ध सेलू पोलिसात दारूबंदीच्या कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांच्या मार्गदर्शनात पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकातील सुधीर कोडापे, विलास गमे, सतीश जांभुळकर, दिनेश तुमाने, योगेश चन्ने, चंद्रकांत जीवतोडे, रणजित काकडे, तुषार भुते, राजेंद्र पायरे, योगेश घुमडे, अमोल तिजारे, अजय वानखेडे यांनी केली.
हिंगणी शिवारात वॉश आऊट मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 12:09 AM
नवरात्र उत्सवा दरम्यान परिसरात शांतता व सुव्यवस्था कायम राहवी या हेतूने पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने हिंगणी शिवारात छापा टाकून वॉश आऊट मोहीम राबविली.
ठळक मुद्दे१.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त : तीन दारूविक्रेत्यांविरुद्ध गुन्हे दाखल