शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
2
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
3
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
4
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
5
"एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना माहीत आहे की..."; महायुतीच्या CM पदाच्या चेहऱ्यावरून ओवेसींचं मोठं विधान
6
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
7
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
8
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
9
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
10
उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
11
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
13
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
14
'डायरिया असताना पावसात शूट केलं रोमँटिक गाणं, वॉशरुमही...' मिनाक्षी शेषाद्रीने सांगितली आठवण
15
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
16
Maharashtra Election 2024 Live Updates: ‘आम्ही हे करू’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरे म्हणाले...
17
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
18
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
19
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
20
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका

सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापन रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 11:55 PM

सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापनाकरिता जिल्ह्यातील ५०० ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली होती. या निवडीला वर्षाचा कालावधी झाला असला तरी एकाही गावांत ही योजना अद्याप कार्यान्वीत झाली नाही.

ठळक मुद्दे५०० ग्रा.पं.तील समस्या कायमच : लोकसंख्येनुसार अनुदान

रूपेश खैरी।ऑनलाईन लोकमतवर्धा : सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापनाकरिता जिल्ह्यातील ५०० ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली होती. या निवडीला वर्षाचा कालावधी झाला असला तरी एकाही गावांत ही योजना अद्याप कार्यान्वीत झाली नाही. परिणामी प्रत्येक गावांत रस्त्याने वाहणारे सांडपाणी आजही वाहतच असून रस्त्याच्या कडेला असलेले कचऱ्याचे ढिग कायम आहेत.ग्रामीण भागात सांडपाण्याची समस्या बिकट रूप धरून आहे. ग्रामीण भागात घराघरातून निघणारे सांडपाणी रस्त्याच्या कडेने वाहत असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले. या पाण्याचे व्यवस्थापन करण्याकरिता स्वच्छता विभागामार्फत नियोजन करण्याच्या सूचना करण्यात आल्या. या सांडपाण्यासह गावातील घनकचरा व्यवस्थापनही करण्यात येणार होते. याकरिता जिल्हा परिषदेमार्फत सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन करण्याबाबत प्रकल्प राबविण्याचा निर्णय झाला. त्याला मंजुरीही मिळाली. ग्रामपंचायती या प्रकल्पाच्या मंजुरीकरिता प्राकलन तयार करण्याच्या सूचनाही करण्यात आल्या. या सुचनेनुसार स्वच्छता विभागाच्यावतीने २२६ प्राकलन तयार करण्यात आले. तर २७५ ग्रामपंचायतीचे प्राकलन तयार करण सुरू आहे. सादर केलेल्या प्राकलनापैकी केवळ ७८ गावांच्या प्राकलनालाच मान्यता देण्यात आली आहे. मान्यता मिळाली तरी प्रत्यक्षात अद्याप काम सुरू करण्यात आले नाही. यामुळे गावांतील स्थिती अद्याप तशीच आहे. याकरिता निवड झालेल्या ग्रामपंचायतीला असलेल्या लोकसंख्येच्या आधारावर अनुदान देण्यात येणार आहे. या अनुदानातून सांडपाण्याचे व्यवस्थापन करण्याच्या सूचना आहे.सांडपाण्याची व्यवस्था करताना या निधीतून नाली बांधकाम करण्यावर बंदी आहे. तर गावाच्या बाहेर येणाºया सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते शेती वा इतर कामांकरिता वापर करण्याच्या सूचना शासनामार्फत करण्यात आल्या आहेत. नागरिकांचे आरोग्य आणि गावाच्या स्वच्छतेकरिता महत्त्वाच्या असलेल्या प्रकल्पाला जिल्हा परिषद प्रशासनाकडून अद्याप मुहूर्त करण्यात आला नाही. यामुळे स्वच्छ गावाच्या संकल्पनेला ब्रेक बसला आहे. याचा विचार होण्याची गरज आहे.ग्रामपंचायतींना मिळणारे अनुदानया प्रकल्पाकरिता ग्रामपंचायतींना अनुदान देण्यात येत आहे. मिळणारे अनुदान गावाच्या लोकसंख्येवर आधारीत आहे. १५० कुटुंब असलेल्या गावांना ७ लाख रुपये मिळणार आहे. एवढी कुटुंब असलेली जिल्ह्यात २८ गावे आहेत. १५० ते ३०० कुटुंब असलेली जिल्ह्यात २२७ गावे असून अशा गावांना १२ लाख रुपये मिळणार आहे. ३०० ते ५०० कुटुंब असलेली १६१ गावे असून त्यांना १५ लाख रुपये मिळणार आहे. ५०० च्यावर कुटुंब असलेली ७५ गावे असून त्यांना २० लाख रुपये मिळणार आहे. यातून सांडपाणी आणि घनकचºयाचे व्यवस्थापन करण्यात येणार आहे.२७ ग्रामपंचायतीच्या प्रकल्पांना मान्यतासादर करण्यात आलेल्या प्राकलनापैकी ७८ प्राकलनाला तांत्रिक मंजुरी देण्यात आली आहे. तांत्रिक मंजुरी देण्याची जबाबदारी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे आहे. यातील २७ गावांत हा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याच्या निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती स्वच्छता विभागाच्यावतीने देण्यात आली आहे. मात्र या निविदा केव्हा निघतील याची माहिती अद्याप कुणाला नाही.गावातील सांडपाणी रस्त्यावरशासनाच्यावतीने सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापन करण्याच्या सूचना असून अंमलबजावणी अद्याप नाही. यामुळे गावातील रस्त्यांवर सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्याचे दिसत आहे.