लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरातील ठाकरे मार्केट समोरील राजेंद्र यादव यांच्या घरा शेजारी असलेल्या नाल्या जवळील जलवाहिनीचा व्हॉल्व्हमध्ये तांत्रिक अडचण झाल्याने दररोज शेकडो लिटर पिण्या योग्य पाण्याचा अपव्यय होत आहे. सध्या अनेकांना घागर-घागर पाण्यासाठी भटकंती करावी लागत असताना दुरूस्तीअभावी होणारा पाण्याचा अपव्यय न.प.च्या पाणी पुरवठा विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित करणारा ठरत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देत तात्काळ योग्य कार्यवाही करण्याची गरज आहे.उन्हाळ्याचे दिवस असल्याने शहरातील अनेक भागातील विहिरी तळ दाखवित आहेत. त्यातच सध्या शहरात नवीन जलवाहिनी टाकण्याचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे. जुन्या जलवाहिनीतील अनेक लिकेजेस बंद करण्यात आल्याने पाण्याचा होणारा अपव्यय थांबल्याचे न.प.च्या पाणी पुरवठा विभागाकडून सांगण्यात येत आहे. परंतु, वास्तव वेळेच असल्याचे या प्रकारामुळे दिसून येत आहे.चक्क वर्षभऱ्यापासून ठाकरे मार्केट भागातील हा व्हॉल्व्ह नादुरूस्त असून दररोज शेकडो लिटर पाणी थेट नाल्यात वाहून जात आहे. सदर प्रकाराची माहिती परिसरातील काही सुजान नागरिकांनी न.प. प्रशासनातील कर्मचाºयांना दिली. मात्र, त्यांच्याकडून व प्रभागातील लोकप्रतिनिधींकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यातच धन्यता मानली जात आहे. पिण्या योग्य पाण्याच्या होणाºया अपव्ययामुळे न. प.च्या पाणी पुरवठा विभागाच्या कार्य प्रणालीबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. वरिष्ठांनी याकडे लक्ष देत तात्काळ योग्य कार्यवाही करण्याची मागणी सुजान नागरिकांकडून होत आहे.वर्ष लोटूनही दुरुस्ती नाहीचठाकरे मार्केट भागातील यादव यांच्या घराच्या शेजारी असलेल्या नाल्याजवळील सदर जलवाहिनीच्या नादुरूत व्हॉल्व्हमुळे दररोज शेकडो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे.हा प्रकार गंभीर असल्याने काहींनी याची माहिती न.प.तील कर्मचाºयांना दिली. परंतु, वर्ष लोटूनही दुरूस्ती करण्यात आली नसल्याचे परिसरातील नागरिक सांगतात.
शेकडो लिटर पाण्याचा होतोय अपव्यय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 10:44 PM
शहरातील ठाकरे मार्केट समोरील राजेंद्र यादव यांच्या घरा शेजारी असलेल्या नाल्या जवळील जलवाहिनीचा व्हॉल्व्हमध्ये तांत्रिक अडचण झाल्याने दररोज शेकडो लिटर पिण्या योग्य पाण्याचा अपव्यय होत आहे.
ठळक मुद्देव्हॉल्व्हच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष : तत्काळ कार्यवाहीची मागणी