घड्याळी होताहेत स्टेटस सिम्बल : महागड्या घड्याळांची मागणी वाढलीपराग मगर वर्धाएकेकाळी किती वाजले, असे विचारताच प्रत्येक जण झटक्यात मनगटावरील घड्याळीत पाहून उपकार केल्यागत वेळ सांगायचा. त्यावेळी घड्याळ ही फॅशन नसून मोठी निकड होती; पण स्मार्टफोनच्या युगात कुणाला वेळ विचारण्याची गरजच उरलेली नाही. परिणामी, मनगटावरील घड्याळीची ‘प्रायोरिटी’ बदलून एक ‘स्टेटस सिम्बल’ म्हणून युवक-युवतींच्या हातावर घड्याळ पाहावयास मिळतात.सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत प्रत्येकाचे जीवन हे घड्याळांच्या काट्यावर चालत असते. मोबाईलचे प्रचलन या काहीच वर्षांत वाढले आहे. त्यापूर्वी बाहेर असताना वेळ पाहण्याचे एकमेव साधन म्हणजे मनगटावरील घड्याळच असायचे. त्यामुळे ज्याच्याजवळ घड्याळ आहे, त्याचा भाव सहाजिकच वधारत असे. मुलांनाही दहावी उत्तीर्ण झाल्यानंतरच महत्प्रयासाने घड्याळ घेऊन मिळत होती. मित्रांच्या गराड्यात एखाद्याच्याच मनगटावर घड्याळ असल्याचे त्याच्यासाठी ते प्रतिष्ठेचे होऊन जात होते. एखाद्याने आपल्याला वेळ विचारावा, अशी इच्छाही युवकांच्या मनी राहत होती. परिणामी, फॅशन आणि गरज या दोन्ही बाबी पूर्ण होत होत्या; पण गत काहीच वर्षांत मोबाईलचे प्रचलन वाढले. सध्या मोबाईलपासून तर स्मार्टफोनपर्यंतची मजल सहज गाठली गेली. यामुळे मनगटावरील घड्याळीचा मुख्य उद्देशच डळमळीत झाला आहे. जो-तो वेळ पाहण्यासाठी लगेच खिशातून मोबाईल काढतो. असे असले तरी युवकांच्या मनगटावर घड्याळही असतेच. त्यातही साध्या घड्याळांची जागा आता महागड्या स्पोर्टी वॉचने घेतल्याचेही दिसून येते. यामुळे फॅशनच्या नावाखाली महागड्या घड्याळी वापरण्याचा ‘टे्रंड’ मुला-मुलींमध्ये निर्माण झाला आहे. यामुळे विविध प्रकारच्या घड्याळींना आजही बाजारात मागणी असल्याचे चित्र आहे.महागड्या वॉचची ‘क्रेझ’मोबाईलमुळे घड्याळीच्या व्यवसायात काय फरक पडला याविषयी विक्रेत्यांना विचारले असता तितकासा फरक पडला नसल्याचे विक्रेते सांगतात. मोबाईलच्या वाढत्या प्रमाणामुळे सुरुवातीला काही काळ याचा परिणाम जाणवला; पण आता तर महागड्या आणि स्पोर्टी वॉचच्या फॅशनची क्रेझ वाढली आहे. त्यामुळे हा उद्योग आणखी वाढल्याचे विक्रेत्यांद्वारे सांगितले जाते. स्वस्त घड्याळींनाही पसंतीमोठे डायल असलेल्या घड्याळीची सध्या फॅशन आहे. अशा घड्याळी या महागड्या असल्या तरी मार्केटमध्ये डुप्लिकेट स्वरूपातील तशाच घड्याळीही मिळतात. ‘यूज अॅण्ड थ्रो’ अशा प्रकारच्या या घड्याळी असतात. त्यामुळे फॅशन म्हणून मुले या घड्याळींवर वेळ निभवून नेत असल्याचेही दिसून येते.
मुलांचा एकमेव दागिनाफॅशन म्हटली की मुली वापरत असलेल्या एकाहून एक बाबी समोर येतात. त्या तुलनेत मुलांकडे फॅशनच्या नावाखाली घड्याळ हा एकमेव पर्याय असतो. लग्नकार्यातही ही बाब प्रकर्षाने जाणवते. महागडे मोबाईल असतानाही दुचाकीवर वेळ बघायला घड्याळ हवीच, असे युवक सांगतात. त्यातही नवनवीन डिझाईनला पसंती असते. अनेक डिझाईनमध्ये तर वेळ लगेच दिसत नसतानाही फॅशनच्या नावावर चालतात. मुलींना ब्रेस्लेट घड्याळींची भुरळमुलींसाठी फॅशनची अमर्याद साधने उपलब्ध आहेत. त्यातीलच एक घड्याळ. सध्या मुलींमध्ये ब्रेस्लेट प्रकारातील घड्याळींची क्रेझ असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे या घड्याळी आहेत की ब्रेस्लेट हे कळणेही कठीणच होते.