शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

शहरवासीयांना पाण्याकरिता चटके

By admin | Published: April 07, 2017 1:59 AM

उन्हाचा पारा ४४ अंशावर स्थिरावत आहे. अशात शहरात पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन लिकेज झाल्याने भर उन्हात नागरिकांची

मुख्य जलवाहिनी लिकेज : तीन दिवसानंतर येणार पाणीवर्धा : उन्हाचा पारा ४४ अंशावर स्थिरावत आहे. अशात शहरात पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन लिकेज झाल्याने भर उन्हात नागरिकांची पाण्याकरिता भटकंती करण्याची वेळ आली आहे. सदर लिकेज हे अमृत योजनेचे काम करताना झाल्याची माहिती आहे. हा लिकेज दुरूस्त करण्याकरिता तीन दिवसाचा कालावधी लागणार असल्याचे सांगण्यात आले आहे. आता खरच हा लिकेज तीन दिवसात दुरूस्त होवून पाणी पुरवठा सुरळीत होतो, अथवा आणखी काही दिवस पाण्याकरिता भटकावे लागते, याकडे शहर वासीयांचे लक्ष लागले आहे. शहरातील नागरिकांना पवनार येथील जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी पुरवठा होतो. शहराला पाणी पुरवठा करणारी हीच पाईपलाईन इंदिरा गांधी यांच्या पुतळ्याजवळ लिकेज झाली आहे. तिच्या दुरूस्तीचे काम सुरू आहे. गत काही दिवसांपूर्वी हिच जलवाहिनी लिक झाली होती. ही जलवाहिनी मुख्य असून ती अत्यंत जुनी आहे. लिकेज झालेल्या ठिकाणी मुख्य जलवाहिनी वरून २०० एम.एम. व्यासाची पाईप आडवी गेली असून लगतच ११ केव्हीची वीजजोडणी ही आहे. त्यामुळे दुरूस्तीचे काम जिकिरीचे व वेळखाऊ झाले आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे याकरिता नगर पालिकेची संपूर्ण यंत्रणा कामाला लागली आहे. ३०.५३ कोटींची अमृत योजनाशहरात अमृत योजनेच्या कामाला प्रारंभ झाला आहे. यात शहरातील ९० टक्के पाईपलाईन बदलण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या योजनेसाठी ३० कोटी ५३ लाख रुपयांचा निधी खर्ची घातला जात आहे. या योजनेच्या कामाला आरती चौक परिसरातून प्रारंभ करण्यात आला आहे. संपूर्ण शहरातील जुन्या पाईपलाईन या योजनेंतर्गत बदलण्यात येणार आहे. यासाठी पाईप तयार असून खोदकाम सुरू करण्यात आल्याची माहिती नगर परिषदेकडून देण्यात आली आहे. हे काम करीत असतानाच पाईपलाईन थोडी डॅमेज झाली; पण दुरूस्ती युद्धस्तरावर सुरू असून लवकरच पाणी पुरवठा सुरू होईल, असेही पालिकेच्यावतीने सांगण्यात आले.