लोकमत न्यूज नेटवर्कआगरगाव : पाणी फाउंडेशनद्वारे आयोजियत वॉटर कप स्पर्धेत ईसापूर गावाने सहभाग घेतला आहे. गावातीला भविष्यात येणाऱ्या पाण्याच्या दुष्कळाशी दोनहात करण्याचे गावकºयांनी ठरविले आणि श्रमदानातून स्पर्धेचा बिगुल फुंकला.गावात आषाढी एकादशी निमित्य महाश्रमदान झाले. या महाश्रमदानाला देवळी येथील नायब तहसीलदार भागवत, ग्रामसेवक पुजा आडे, सरपंच प्रणिता आंबटकर, उपसरपंचासह सदस्य, शिपाई, ग्रामसेवक संघटना, वैद्यकीय जनतागृतीमंचाचे सदस्य, सद्भावना ग्रामीण विकास संस्था, स्वयंसेवक, मुरदगांव, लोणी येथील वॉटर हिरो, पाणी फाउंडेशन जिल्हा समन्वयक अशोक बगाडे, तालुका समन्वयक दीपक तपासे, ज्योती ठाकरे, सामाजिक प्रशिक्षक प्रशांत देवळे, पूष्पा नागले, तांत्रिक प्रशिक्षक अजित डंभारे, हर्षवर्धन बनोकर, हरिदास महाजन, आपले सरकार, गावातील नागरिकांचा सहभाग होता.यावेळी तहसीलदार भागवत यांनी मार्गदर्शन केले. या श्रमदानमुळे गावात भविष्यात भेडसावणारी पाणी टंचाई सूटनार व गाव पाणीदार होण्यास मदत होईल असे त्या म्हणाल्या. श्रमदानाकरिता गवातील जुळलेल्या लोकांची संख्या पाहुन हा विश्वास सर्व अधिकारी व लोकांना मिळाला. या श्रमदानामुळे महाराष्ट्र दुष्काळ मुक्त होण्यास वेळ लागणार नाही. म्हणून आतापर्यंत जे या चळवळीत जुळले नसतील त्यांनी ईसापूर येथे येत श्रमदान करून या चळवळीला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.विरूळात रणरागीणी सरसावल्याविरुळ (आकाजी) - आर्वी तालुक्यातील खैरी या आदिवासी बहुल गावातील पाच उच्चशिक्षीत तरुणींनी भल्या पहाटे हातात पावडे व टोपले घेवुन गावातील दुष्काळ कायमचाच हटवायचा व गाव पाणीदार करायचे ही जिद्द बाळगली. त्यांच्या जिद्दीला आता गावकºयांचेही सहकार्य लाभत आहे.विरुळ पासून पाच किमी अंतरावर निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या आदिवासीबहुल गावात दरवर्षीच उन्हाळ्यात पाणीटंचाई असते. गावातील दुष्काळ कायमचाच संपवावा यासाठी या पाच रणरागीणींनी पुढाकार घेतला. या पाचपैकी अश्विनी ही बँकेत नोकरी करते व तिच्या सोबतीला अंकीता, सुनीता, समीना व नेहा या दहावी-बारावीतल्या मुलींनी भल्या पहाटे हातात टोपले व पावडे घेवुन श्रमदान करायला सुरूवात केली. वॉटर कप स्पर्धेत पाण्याचे महत्त्व गावकºयांना पटवून दिले. गावकºयांना ही बाब पटली. बघता -बघता अख्ख गाव या मुलींच्या मागे धावून आलं व रोज सकाळी श्रमदानाला सुरूवात झाली. गावात प्रत्येक घरी शोष खड्डे, नाल्यावर दगडी बांध, सीसीटी, तलावाचे खोलीकरण आदी कामे झाली. गावकºयांच्या परिश्रमातून दुष्काळ कायमचाच संपेल, असा दृढ विश्वास गावकºयांत आहे. या तरुणींनी तलावातून माती आणून रोपवाटीका तयार केली. पावसाळ्यात बांधावर व घरी एक तरी झाड लावण्याची तयारी सुरु आहे. याकरिता सुवालाल कासार, अंकुश लवाने, किरण कुभेकार, राजु कुंभेकार, जीवन चोरमुले, तुळशीदास कुंभेकार, चंन्द्रशेखर गायकवाड व गावकर्यांचे सहकार्य लाभत आहे.जैन संघटनेच्यावतीने नि:शुल्क जेसीबी व पोकलॅन्डवर्धा- दुष्काळ मुक्त महाराष्ट्र अभियानात भारतीय जैन संघटनेचे संस्थापक भाऊ शांतिलालजी मुथा महाराष्ट्र दौरावर आहेत. त्यांची सभा सोमवारी (दि.२३) रोजी विकास भवन येथे आयोजित आहे. पाणी फाउंडेशनने आयोजित केलेल्या वॉटर कप स्पर्धेतील जलसंधारणाच्या कार्यात जे गांव श्रमदानाचा विशिष्ट टप्पा पार करतील त्या सर्व गावांना बीजेएस नि:शुल्क जेसीबी, पोकलेन मशीन पुरवून कठीण कार्य पूर्ण करण्यास मदत करणार आहेत. जिल्ह्यातील चार तहसील या स्पर्धेत सहभागी आहे. या सभेत सर्व सरपंच, ग्रामसेवक, तहसीलदार, कृषी अधिकारी, पाणी फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित राहतील. कार्यक्रमचे मुख्य अतिथी म्हणून खा. रामदास तडस, आ. अनिल सोले उपस्थित राहतील. या सभेला सर्व नागरिकांनी, स्वयंसेवी संस्थाच्या सदस्यांनी उपस्थित राहावे अशी विनंती योगेंद्र फत्तेपुरिया, अनिल फरसोले,मनोज श्रावणे, अभिषेक बैद, स्वाती ढोबले, शैलेन्द्र दफ्तरी, रितेश लुनावत, विवेक कांकरिया आदींनी केले आहे.
इसापुरात श्रमदानातून वॉटर कप स्पर्धेचा बिगुल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 12:06 AM
पाणी फाउंडेशनद्वारे आयोजियत वॉटर कप स्पर्धेत ईसापूर गावाने सहभाग घेतला आहे. गावातीला भविष्यात येणाऱ्या पाण्याच्या दुष्कळाशी दोनहात करण्याचे गावकºयांनी ठरविले आणि श्रमदानातून स्पर्धेचा बिगुल फुंकला.
ठळक मुद्देविरूळात रणरागीणी सरसावल्याजैन संघटनेच्यावतीने नि:शुल्क जेसीबी व पोकलॅन्ड