लोकमत बाल विकास मंचचा उपक्रम : २९६ विद्यार्थ्यांचा सहभाग वायगाव (नि.) : लोकमत बाल विकास मंच व श्री क्षेत्र लक्ष्मी माता देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत २९६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. ही स्पर्धा तीन गटात घेण्यात आली. पर्यावरण व निसर्ग असे विषय दिलेल्या या स्पर्धेतून बालकांनी जल बचत व पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. यात यशवंत विद्यालय वायगाव (नि.), सरस्वती विद्या मंदिर, आॅक्सफोर्ड पब्लिक स्कूल, जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा येथील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. इयत्ता १ ते ४ आणि ५ ते ७ करीता पर्यावरण व निसर्ग असे विषय होते. तर इयत्ता ८ ते १० मधील स्पर्धकांना स्वैर रेखाटण करायचे होते. यानंतर चित्राचे प्रदर्शन ठेवण्यात आले होते. परीक्षक म्हणून रिझवान खान होते. यानंतर स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष लक्ष्मीमाता देवस्थानचे अध्यक्ष कृष्णा धोटे होते. प्रमुख अतिथी डॉ. संजय शेंद्रे, आॅक्सफोर्ड पब्लिक स्कूलचे प्राचार्य पुरूषोत्तम पोफळी, देवस्थान कमिटीचे सचिव गणेश सोनटक्के, गुरूदेव सेवा मंडळ अध्यक्ष बाबाराव देशमुख, नरेंद्र मते, यशवंत विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र साळूंके, रिझवान खान उपस्थित होते. स्वातंत्र्य संग्राम सेनानी व लोकमत वृत्तपत्राचे संस्थापक जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात केली. १ ते ४ गटात प्रथम क्रमांक श्रावणी लोंडे, द्वितीय मनस्वी डूडूरकर, तृतीय नियती क्षीरसमुद्रकार हिने मिळविला. प्रोत्साहन पुरस्कार प्राची दुरगकर, अभिलाषा तरवटकर यांनी प्राप्त केले. गट ५ ते ७ मध्ये प्रथम स्थान सलोनी कोळसे, द्वितीय मधुरा चौधरी, तृतीय मंथन बिडकर तर प्रोत्साहनपर बक्षीस वेदांत रूईकर, प्राची थुल यांनी मिळविले. गट ८ ते १० मध्ये प्रथम क्रमांक आकांक्षा उघडे, द्वितीय मृणाल मिरापूरकर तर तृतीय निकिता साळूंके हिने मिळविला. प्रोत्साहनपर बक्षीस आयुश थुल, वृषभ सातकर यांनी मिळविली. यासह ओम काळे, श्रृती लोखंडे, दिव्या दुर्गे, आचल कुंभारे, केतन हरणे, प्रणाली जोगे, दामिणी शिघरे, सिद्धी रेवतकर यांना मान्यवरांच्या हस्ते पदक प्रदान करण्यात आले. स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना लोकमत बाल विकास मंच तर्फे खाऊचे वाटप करण्यात आले. स्पर्धेला यशवंत विद्यालयातील शिक्षिका साधना घोडखांदे, नंदनवार, जाधव, आॅक्सफोर्ड पब्लिक स्कूल येथील धिरज दांडेकर, अनूप चिंचपाळे, सरस्वती विद्या मंदिर येथील मालू चौधरी, संगीता पाटील, अनिकेत धोटे, शुभांगी सुपारे, मनीषा कोपरकर यांनी सहकार्य केले. संचालन साधना घोडखांदे यांनी तर आभार गौरव देशमुख यांनी मानले.(उपक्रम प्रतिनिधी)
चित्रकलेतून दिला जल बचतीचा संदेश
By admin | Published: July 21, 2016 12:45 AM