लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : उन्ह तापताच पाणीटंचाईचे सावट गडद होतात. जिल्हा प्रशासनाने यंदा ७०९ गावांचा पाणीटंचाईचा आराखडा तयार केला होता. यातील पहिल्या टप्प्यात २२९ गावांत तर तिसऱ्या टप्प्यात १५९ गावांत पाणीटंचाई जाणवेल, अशी शक्यता वर्तविण्यात आली होती. जिल्ह्यात यंदा जलयुक्त शिवारमुळे टंचाईची तीव्रता जाणवत नसली तरी अनेक गावांत पाणीटंचाईने डोके वर काढले आहे. यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे.जिल्हा प्रशासनाने यंदा ७०९ गावांत पाणीटंचाई निर्माण होईल, असा आराखडा तयार केला होता. यात काय उपाययोजना करणार, हे देखील निश्चित करण्यात आले होते. त्या दृष्टीने उपाययोजना केल्या जात आहेत. विहिरींचे खोलीकरण, विंधन विहिरी यासह जलयुक्त शिवार अंतर्गत कामे करण्यात येत आहेत. यामुळे यंदा फारशी पाणीटंचाई जाणवत नसली तरी काही गावांत नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे चित्र आहे. वर्धा तालुक्यातील सेलूकाटे येथेच काही भागात पाणी पोहोचत नसल्याने टँकरने पाणी पुरवठा केला जात असल्याचे दिसते.१५ दिवसांपासून नेरी पुनर्वसनचा पाणीपुरवठा ठप्पलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नेरी गावाचे सालोड येथे पुनर्वसन करण्यात आले आहे. येथील पाणीपुरवठा योजना मागील १५ दिवसांपासून बंद आहे. योजनेचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला सरपंच व ग्रामसेवकांचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी, येथे कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली असून नागरिकांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे.नेरी पुनर्वसन हे वॉर्ड क्र. १ व २ अशा दोन भागात वसलेले आहे. वॉर्ड क्र. दोनचा काही भाग टेकडीवर आहे. यामुळे हातपंपालाही पाणी कमी येते. धोत्रा रोडवरील विहिरीवरून येणारे पाणी क्षारयुक्त व दूषित असल्याने ते पिण्यास अयोग्य आहे. शिवाय आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक आहे. यामुळे नागरिकांना अनेक आजारांना तोंड द्यावे लागत आहे. ही बाब लक्षात घेत नेरी पुनर्वसन येथील पिण्याच्या पाण्याची कायमस्वरुपी सोय करून देण्यात यावी. जीवन प्राधिकरणद्वारे तथा शुद्धीकरण केलेल्या पाण्याचा पुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. सध्या बंद असलेली पाणीपुरवठा योजना त्वरित सुरू करावी. अन्यथा आंदोलन करू, असा इशाराही जिल्हा प्रशासनाला तक्रारीतून दिला आहे. यावेळी जयश्री दारोडकर, श्रीकृष्णा टोकसे, सुखदेव मिरगे, सरला बन्सोड, बन्सोड आदी उपस्थित होते.खळ्यावर मांडला ठिय्यागुरांचे कळप एका गावातून दुसºया गावात हलविण्याचे प्रयत्न शेतकरी व गवळी करीत आहे. मुबलक पाणी व शेती असलेल्या शेतकºयांच्या शेतात खळे तयार करुन तेथे ठिय्या मांडला आहे.
पाणीटंचाईचे सावट गडद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2018 10:51 PM
उन्ह तापताच पाणीटंचाईचे सावट गडद होतात. जिल्हा प्रशासनाने यंदा ७०९ गावांचा पाणीटंचाईचा आराखडा तयार केला होता. यातील पहिल्या टप्प्यात २२९ गावांत तर तिसऱ्या टप्प्यात १५९ गावांत पाणीटंचाई जाणवेल, अशी शक्यता वर्तविण्यात आली होती.
ठळक मुद्देआराखड्यात ७०९ गावे : पंचाळा गावात तीव्रता अधिक