लोकमत न्यूज नेटवर्ककेळझर : गांधी जयंती दिनी गणपूर्ती अभावी तहकुब झालेली ग्रामसभा मंगळवारी सकाळी बोलाविली. सभेला १४४ उपस्थित ग्रामस्थांच्या स्वाक्षºया घेण्यात आल्या. उशिरापर्यंत गावकºयांची गर्दी झाली. उशीरा आलेल्या ग्रामस्थांना रजिस्टरमध्ये ग्रामविकास अधिकारी ढोक यांनी स्वाक्षºया करू दिल्या नाही.या सभेच्या विषयसूचीवर पाणीपुरवठा समितीच्या अध्यक्ष निवडीचा विषय होता. सभा अध्यक्ष जि.प. सदस्य विनोद लाखे यांनी विषयावर चर्चा केली. यावेळी सभेमधून अध्यक्ष पदाकरिता आनंद रामदास खोब्रागडे, शरद गंगाधर नखाते, गोविंदा चिंधूजी घंगारे व डॉ. नरेश सोमनाथे यांची नावे आली.सभेच्या हजेरी बुकात स्वाक्षºया केलेल्या १४४ ग्रामस्थांनी त्यांच्या पसंतीच्या उमेदवाराला हात वर करून पाणीपुरवठा समिती अध्यक्ष म्हणून निवडण्याचा सूचना सभाध्यक्ष लाखे यांनी केली. यावर काहींनी आक्षेप घेत गुप्त मतदान घेवून अध्यक्ष निवडावा अशा सूचना सभेत केल्या. त्यानंतर मतभेद वाढल्याने सभेत गोंधळाची स्थिती निर्माण झाली. गोंधळ करणाºयांना समजाविण्याचा प्रयत्न सभाध्यक्षांसह सरपंच रेखा शेंद्रे, उपसरपंच फारूख, सिताराम लोहकरे यांनी केला. परंतु उपयोग झाला नाही. या गोंधळामुळे आनंद खोब्रागडे व शरद नखाते यांनी अध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेतली. यामुळे डॉ. सोमनाथे व घंगारे यांच्यातून अध्यक्ष निवडणे अपेक्षित होते. तरीही ग्रामस्थांचा गोंधळ सुरूच होता. शेवटी सभाध्यक्ष विनोद लाखे सभा अर्धवट सोडून निघून गेले. दरम्यान आनंद खोब्रागडे यांनी पुन्हा सभाध्यक्षांना विनंती करून सभास्थळी बोलाविले. तरी ग्रामस्थांचा गोंधळ संपताना दिसत नसल्याने ग्रामविकास अधिकारी ढोक यांच्या सल्ल्याने सभाध्यक्ष लाखे यांनी सदर सभा तहकूब होत असून ती १२ आॅक्टोबर २०१७ गुरुवारी घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले. त्याच वेळी पाणीपुरवठा समिती अध्यक्षाची निवड करण्यात येईल असेही सांगितले. गणपूर्ती अभावी तहकूब झालेली सभा गोंधळामुळे स्थगीत करता येते का? असा प्रश्न येथील सिंदी (रे.) कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक युसूफ शेख यांनी ढोक यांना विचारला असता त्यांनी त्यास होकार दिला. यामुळे ग्रामसभा आता गुरूवारी होणार आहे.१ कोटी १० लक्ष रुपयांचा उच्चार केल्याने वाढली चूरससभाध्यक्ष विनोद लाखे यांनी गावातील पाणीपुरवठा योजनेकरिता शासनाकडून १.१० कोटी रुपये मंजूर झाल्याची घोषणा केली. सदर निधी केंद्र शासनाच्या राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत मिळणार असल्याचे समजते. प्रत्यक्षात सरपंच व उपसरपंच यांना विचारा केली असता अद्याप शासनाकडून या योजने अंतर्गत एकही रुपयाचा निधी मिळाला नसल्याचे सांगितले.
पाणीपुरवठा समिती अध्यक्ष निवडीच्या मुद्यावरून गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 1:14 AM
गांधी जयंती दिनी गणपूर्ती अभावी तहकुब झालेली ग्रामसभा मंगळवारी सकाळी बोलाविली. सभेला १४४ उपस्थित ग्रामस्थांच्या स्वाक्षºया घेण्यात आल्या. उशिरापर्यंत गावकºयांची गर्दी झाली.
ठळक मुद्देतहकूब ग्रामसभा पुन्हा स्थगित : विषय सुचीतील विषय चर्चेविना