नगरपंचायतच्या नळ योजनेचा पाणीपुरवठा कधी ४ दिवसानंतर तर कधी ५ ते ७ दिवसाच्या अंतराने होत आहे. त्यामुळे संपूर्ण गावाला पाणीटंचाईची झळ बसत आहे. नवीन काॅलनी व नवीन बांधलेले घरी विहीर खोदलेली आहेत पण एप्रिल महिन्यातच विहीर कोरड्या पडतात . त्यामुळे पाणीटंचाईची झळ सर्वांनाच सोसावी लागते . काही वार्डात तर टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागतो पण नगरपंचायतचे लक्ष नसल्याने येथील मनीष गांधी यांनी आ. समीर कुणावार यांचे या प्रश्नाकडे लक्ष वेधले. व गावाला टॅंकरने पाणी वाटण्याची विनंती केली. आ. समीर कुणावार यांनी त्वरित दखल घेऊन समुद्रपूर शहराला टॅंकरने पाणी वाटपाला सुरुवात केली. पावसाळा सुरू होईपर्यंत टॅंकरने पाणीपुरवठा सुरू ठेवावा अशी मागणी आहे.
समुद्रपूर येथे नवतपात टॅंकरद्वारे पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 4:42 AM