घोराडचे प्रकरण : आयुक्तांचे सीईओंना पत्रघोराड : येथील नवीन पाणीपुरवठा योजनेत केलेल्या कामाची ट्रायलपीटनुसार चौकशी करून तथ्य आढळल्यास संबंधीतांवर नियमानुसार कारवाई करण्याचे पत्र नागपूर विभागाचे विभागीय आयुक्त यांनी वर्धा जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहे. या पत्रानुसार ही चौकशी होणार की दडपली जाणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.घोराड येथील पाणी पुरवठा व स्वच्छता समितीने केलेल्या गैरव्यवहाराची चौकशी करून दोषी व्यक्तींवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशा मागणीचे निवेदन विभागीय आयुक्त व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रहार पक्ष संघटनेचे तालुका अध्यक्ष मिलिंद गोमासे यांनी दिले होते. या निवेदनावर १०५ ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या होत्या. या निवेदनाची दखल घेत विभागीय आयुक्तांनी २७ जून २०१६ क्र. विशा/शा.अ.-१/सी.आर.०१/२०१६-३७० या पत्रान्वये जि.प.च्या सीईओंना चौकशी करून अहवाल ग्रामविकास मंत्रालयाला पाठविण्याचे म्हटले आहे.घोराड येथील स्वप्नील माहुरे यांनी पूर्वीच योजनेतील भ्रष्ट्राचाराची पुराव्यानिशी तक्रार केली होती. त्या तक्रारीच्या आधारावर चौकशी सुद्धा झाली; पण चौकशी अहवालावरील कारवाई मात्र थंडबस्त्यात राहिली. या तक्रारीचा अनुषंगाने विभागीय आयुक्त यांनी जिल्हा परिषदेला तिसरे स्मरण पत्र दिले आहे. याच्या चौकशीची मागणी प्रहारने केली आहे.(वार्ताहर)बच्चु कडू यांना निवेदनघोराड येथील पाणी पुरवठा व स्वच्छता समितीने केलेल्या गैरव्यवहाराबाबत केलेल्या तक्रारीची, तक्रारीवर झालेली चौकशी व चौकशी अहवाल यानंतर तक्रार कर्त्यांने केलेल्या पाठपुराव्याची कागदपत्रे नागपूर येथील रविभवनमध्ये प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आमदार बच्चू कडू यांची भेट घेऊन सुपूर्द केले. या प्रकारणात लक्ष घालून दोषीवर कारवाईची मागणी केली.
पाणी पुरवठा योजनेतील कामाची ट्रायलपिटनुसार होणार चौकशी
By admin | Published: July 04, 2016 1:37 AM