प्रफुल्ल लुंगे।लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : शहरात पुरवठा केल्या जाणाऱ्या पाण्यात क्षाराचे प्रमाण जास्त आहे. जलशुद्धीकरण केंद्र नसल्याने केवळ पाण्याच्या विहिरीत ब्लिचिंग पावडर टाकून पाण्याचे नाममात्र शुद्धीकरण केल्या जाते. या सर्व गंभीर बाबीचा विचार करून सेलू शहराला नगर उत्थान योजनेंतर्गत बोरधरणवरून पाणी पुरवठा करणारी नळ योजना मंजूर आहे. सुमारे ३७ कोटी रूपयांची ही योजना मुंबईला मंत्रालयस्तरावर अंतीम सोपस्कारात असून या पाणी पुरवठा योजनेला मुर्तरूप आल्यास अशुद्ध व क्षारयुक्त पाण्यातून सेलू शहरवासीयांची सुटका होणार आहे.शहराला सध्या बेलगाव येथील श्रीक्षेत्र उत्तरवाहिणी व जवादे यांच्या शेतातील विहिरीतून पाणी पुरवठा केल्या जात आहे. या बरोबरच बेलगाव गावातील खोडके कुटूंबाचे दान दिलेल्या विहिरीला भरपूर पाणी असल्याने तेथूनही पाणी पुरवठा केल्या जातो. शहरातील काही बोअरवेल व विहिरीवरून मोटारपंप लावून पाणी पुरवठ्याचे सातत्य कायम आहे. भर उन्हाळ्यातही शहरवासीयांना पुरेसे पाणी मिळेल अशी अवस्था आहे;पण या सर्व पाण्यात प्रमाणापेक्षा जास्त क्षाराचे प्रमाण असल्याने हा प्रकार नागरिकांच्या आरोग्यासाठी हानीकारक ठरत आहे. या योजनेंतर्गत बोरधरणाजवळ पाणी पुरवठा करणारी विहीर खोदल्या जाणार आहे. येथून सेलूपर्यंत सुमारे १६ किमी जलवाहिनी टाकल्या जाणार आहे. सेलूच्या भगत ले-आऊट, मटन मार्केट व बेलगावच्या खोडके ले-आऊट या ठिकाणी जलकुंभाची निर्मिती केली जाणार आहे. खोडके ले-आऊटच्या मोकळ्या जागेवर जलशुद्धीकरण केंद्र उभारल्या जाणार आहे. या सर्व कामांचे द्रोण कॅमेराद्वारे वर्षभरापूर्वीच मोजमापही करण्यात आले आहे. मंत्रालयात शासनस्तरावर या योजनेला लवकरच हिरवी झेंडी मिळाल्यास नवीन वर्षाच्या शेवटपर्यंत सदर कामही पूर्णत्वास जावू जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. एकूच या कामामुळे जलसंकटावर मात करता येणार आहे.लोकप्रतिनिधींचा पुढाकार आवश्यकसेलू शहराला पुरवठा करण्यात येणाºया पाण्यात क्षाराचे प्रमाण अधीक आहे. त्याला आरोग्य विभागानेही वेळोवेळी दुजोरा दिला आहे. सदर पाणी जास्त काळ पिण्यात आल्यास अनेक आजारांची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे नव्या योजनेचे काम तातडीने सुरू करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.बोरधरणावरून सेलू शहराला पाणी पुरवठा करणारी योजना नगर उत्थान योजनेंतर्गत होत आहे. मंत्रालयस्तरावरून लवकरच मंजूरी प्राप्त होण्याचे संकेत आहेत. ३७ कोटी रूपयांची ही योजना सेलू शहरवासीयांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करणारी योजना ठरेल. यामुळे शहरवासीयांची क्षारयुक्त पाणी पिण्यापासून सुटका होणार आहे. नव्या वर्षाच्या अखेरपर्यंत योजना पूर्ण होवून कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे.- डॉ. राजेश जयस्वाल, अध्यक्ष, नगरपंचायत, सेलू.
बोरधरणवरून होणार सेलूला पाणी पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 11:19 PM
शहरात पुरवठा केल्या जाणाºया पाण्यात क्षाराचे प्रमाण जास्त आहे. जलशुद्धीकरण केंद्र नसल्याने केवळ पाण्याच्या विहिरीत ब्लिचिंग पावडर टाकून पाण्याचे नाममात्र शुद्धीकरण केल्या जाते.
ठळक मुद्देनगर उत्थानचा निधी : तीन जलकुंभासह जलशुद्धीकरण केंद्राची निर्मिती