लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पावसाचे पाणी नदी नाल्यातून वाहून जात असल्याने त्याचा सिंचनाकरिता वापर करण्याच्या उद्देशाने जलयुक्त शिवार योजना अंमलात आणली. या योजनेतून झालेल्या कामांत यंदाच्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात जलसाठा निर्माण होणार असल्याचा दावा जिल्हा प्रशासनाच्यावतीने व्यक्त करण्यात आला आहे. वर्धेत गत तीन वर्षांत या अभियानातून तब्बल जिल्ह्यात ५ हजार ९९१ कामे झाली आहेत. तर ९२६ कामे प्रगतीपथावर असल्याचे सांगण्यात आले आहे.यंदाच्या सत्रात जलयुक्तची १ हजार ४८२ कामे मंजूर झाली आहे. त्यातील आतापर्यंत ५५६ कामे पूर्ण झाली आहेत.उर्वरीत कामे प्रगतीपथावर असून पाऊस येण्यापूर्वी ती कामे पूर्णत्त्वास आणण्याकरिता प्रशासन कार्यरत असल्याचे दिसून आले आहे.जलयुक्त अभियान मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाकांक्षी अभियान म्हणून ओळखले जात आहे. या अभियानातून जिल्ह्यात झालेल्या कामांवर शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च झाला. या खर्चाचे वर्धा जिल्ह्यात फलीत झाल्याचे दिसून आले आहे. कोरडवाहू असलेल्या जिल्ह्यात अभियानामुळे सिंचनाचा टक्का वाढल्याचे दिसून आले. सिंचन क्षेत्र वाढल्याने शेतकऱ्यांच्या एकरी उत्पादनातही वाढ झाल्याचे जिल्हा प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे. जिल्ह्यातील काही भागात शेतकऱ्यांनी या अभियानातून झालेल्या जससंचयातून आपल्या शेतात पाणी घेत मोठ्या प्रमाणात ओलीत केल्याचे सांगण्यात आले आहे.अभियान सुरू झाले झाले त्या काळापासूनच जिल्ह्यात या कामाला शेतकऱ्यांकडून बऱ्यापैकी सहकार्य मिळाल्याचे दिसून आले. या अभियानातून जिल्ह्यातील अनेक नाले सरळ झाले, नद्यांचा अडलेला प्रवाह मोकळा करण्यात आला. गावात शेतकऱ्यांच्या शेतातून जाणारे नाले सरळ झाले. पर्यायाने त्यांच्या शेतालगत पाणी आल्याने सिंचनाची सुविधा आली.वर्धा जिल्ह्यात २०१५-१६ मध्ये ३ हजार ७० कामे पूर्ण झाली. या कामांतून जिल्ह्यात ३७ हजार ५४८ टीएमसी जलसाठा निर्माण झाला होता. २०१६-१७ मध्ये २ हजार ३०५ कामे झाली. या कामातून २४ हजार ५७७ टीएमसी जलसाठा झाल्याचे सांगण्यात आले. २०१७-१८ मध्ये ५५६ कामे पूर्ण झाली आहे. या कामातून १ हजार ३१७ टीएमसी जलसाठा उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या व्यतिरिक्त अनेक कामे प्रगतीपथावर असल्याचे सांगण्यात आले आहे. शेतकऱ्यांकरिता महत्त्वाचा ठरणाºया या जलयुक्त अभियानात अनेक सामाजिक संस्थांनी आपले पाठबळ दिल्याचेही जिल्ह्यात झालेल्या कामावरून दिसून आले आहे. त्याचा लाभ काय हे लवकरच कळेल.सिंचन क्षमतेत कमालीची वाढजिल्ह्यात जलयुक्त शिवारची कामे पूर्णत्त्वास येत असल्याने त्याचा लाभ शेतकऱ्यांना होत असल्याचे आता दिसत आहे. या कामांतून मोठ्या प्रमाणात पाण्याची सुविधा उपलब्ध झाल्याने कोरडवाहू शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सिंचन करण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. या जलयुक्त शिवारच्या कामातून जिल्ह्यात १ लाख ३६ हजार ५०४ हेक्टर क्षेत्रावर सिंचन होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या अभियानातून अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात शेततळे केले आहे. यात पाणी साठवण झाल्याने काही शेतकऱ्यांनी तर यातून दुहेरी व्यवसाय सुरू केला असून दुहेरी नफा कमविण्याचा प्रयत्नही केला आहे. शेततळ्यात साचलेल्या पाण्यात मच्छीपालनही काही शेतकºयांनी केले आहे. तर काही शेतकऱ्यांच्या शेतालगत नाल्यात पाणी अडल्याने त्यांच्या विहिरीचे पाणी भर उन्हाळ्यात कायम असल्याचे दिसून आले आहे.
तीन वर्षांत जलयुक्तची ५,९९१ कामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 9:39 PM
पावसाचे पाणी नदी नाल्यातून वाहून जात असल्याने त्याचा सिंचनाकरिता वापर करण्याच्या उद्देशाने जलयुक्त शिवार योजना अंमलात आणली. या योजनेतून झालेल्या कामांत यंदाच्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात जलसाठा निर्माण होणार असल्याचा दावा जिल्हा प्रशासनाच्यावतीने व्यक्त करण्यात आला आहे.
ठळक मुद्देपावसाळा तोंडावर : झालेल्या कामांतून मोठ्या प्रमाणात जलसंचयाचा दावा