लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहराला पाणी पुरवठा करण्याकरिता असलेल्या येळाकेळी येथील योजनेच्या विहिरीने तळ गाठला. यामुळे नगर परिषदेच्यावतीने सिंचन विभागाचे पाणी वळवून या विहिरीच्या परिसरात आणले. ते पाणी आज शहरातील काही भागात पोहोचले तर काही भाग कोरडा राहिला. आता हे पाणीही संपले असल्याने येळाकेळी येथील पाणी पुरवठा योजनेला कोरड पडली आहे. येथे पाणी नसल्याने शहरातील नागरिकांची तहान कशी भागवावी अशी चिंता नगर परिषदेला पडली आहे.शहरवासीयांना पाणी पुरविण्याकरिता नगरपरिषदेच्यावतीने कायद्याचे उलंघन करून सिंचन विभागाचे पाणी योजनेच्या विहिरीपर्यंत आणले. हे पाणी येथील जलशुद्धीकरण केंद्रात आणून ते शहरातील नागरिकांना पाठविले. यात प्रतापनगर व साबळे प्लॉट परिसर वगळता इतर भागात पाणी पोहोचले. यामुळे नागरिकांकडून पाण्याचा साठा करण्यात आला. यातून दोन दिवसाची गरज भागेल पण नंतर काय करावे अशी चिंता आता पालिका प्रशासनासह वर्धेकर नागरिकांना पडली आहे. येळाकेळी येथील नदी खोदून पाणी जमा करून एक दिवस पाणी पुरवठा करण्यात आला. आता तसे करणे शक्य नसल्याचे दिसून आले. हा प्रकार अधिक प्रमाणात केल्यास आसपासच्या परिसरात पुराचा धोका उद्भवण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.पाऊस येण्याची सध्या चिन्हे दिसत नाही. तर धाम प्रकल्पातील पाणी सोडण्याकडे जिल्हा प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचे दिसून आले आहे. परिणामी पाणी पुरवठा विभागाच्या विहिरीत पाणी येणे शक्य नाही. यामुळे शहरात पाणी पुरवठा करण्याची मोठी अडचण निर्माण झाली आहे. या संदर्भात पालिका प्रशासनाकडून जिल्हाधिकारी यांची भेट घेण्यात येणार असल्याची माहिती आहे. यामुळे धाम प्रकल्पाचे पाणी सोडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या चर्चेत काय मार्ग निघतो याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.नगर परिषदेच्या वतीने सिंचन विभागाचे पाणी असे वळविले होतेनगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्यावतीने तयार केलेल्या बंधाऱ्यात पाण्याचा एकही थेंब दिसत नसल्याने रविवारी सकाळच्या सुमारास पालिकेच्यावतीने या परिसरात असलेल्या पाणी पुरवठ्याच्या विहिरीत सिंचन विभागाचे पाणी सोडले. यामुळे शहरातील काही नळांना पाणी आले. आता मात्र येथे पाण्याचा ठणठणाट झाला आहे. यामुळे पावसाच्या पाण्याशिवाय पर्याय नसल्याचे दिसून आले आहे.
पाण्याचा ठणठणाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 10:08 PM
शहराला पाणी पुरवठा करण्याकरिता असलेल्या येळाकेळी येथील योजनेच्या विहिरीने तळ गाठला. यामुळे नगर परिषदेच्यावतीने सिंचन विभागाचे पाणी वळवून या विहिरीच्या परिसरात आणले. ते पाणी आज शहरातील काही भागात पोहोचले तर काही भाग कोरडा राहिला. आता हे पाणीही संपले असल्याने येळाकेळी येथील पाणी पुरवठा योजनेला कोरड पडली आहे. येथे पाणी नसल्याने शहरातील नागरिकांची तहान कशी भागवावी अशी चिंता नगर परिषदेला पडली आहे.
ठळक मुद्देवळविलेले पाणीही संपले : आता पावसाच्या पाण्याशिवाय पर्याय नाही