शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
2
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
3
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
4
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
5
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
6
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
7
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
8
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
9
महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले? काँग्रेस १०० जागा, तर ठाकरे शिवसेना, पवार गट एवढ्या जागा लढविणार
10
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
11
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
12
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
13
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
14
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
15
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
16
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
17
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
18
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
19
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
20
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य

विद्यार्थ्यांना कार्यशाळेतून मिळाला यशाचा मार्ग

By admin | Published: April 10, 2016 2:31 AM

'लोकमत' व 'विद्यालंकार'च्या वतीने दहावीची परीक्षा दिलेले विद्यार्थी आणि पालकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा...

'लोकमत' व 'विद्यालंकार'तर्फे मार्गदर्शनवर्धा : 'लोकमत' व 'विद्यालंकार'च्या वतीने दहावीची परीक्षा दिलेले विद्यार्थी आणि पालकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा 'यशाचा मार्ग - २0१६'चे आयोजन ३१ मार्च रोजी विद्यादीप हॉटेल, यशवंत कॉलेज जवळ, लक्ष्मीनगर, वर्धा येथे करण्यात आले होते. या कार्यशाळेत विद्यालंकारकडून मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी अतिथी म्हणून शिक्षणतज्ज्ञ संदीप पाटील, विद्यालंकार क्लासेसचे संचालक निता घुसे, संचालक प्रणव घुसे, विद्यालंकार वर्धा शाखेचे लोकमतचे कार्यालयप्रमुख उमेश शर्मा तसेच जिल्हाप्रतिनिधी राजेश भोजेकर आदि मान्यवर उपस्थित होते. सुरुवातीला लोकमतचे संस्थापक संपादक स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी संदीप पाटील यांनी अभियांत्रिकी व वैद्यकीय शिक्षणासाठीच्या आयआयटी - जेईई अँडव्हान्स, जेईई मेन, एमएचसीईटी यांसारख्या विविध स्पर्धा परीक्षेत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना या परीक्षेमध्ये प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी किमान ५0 सेकंदांचा वेळ लागतो व यासाठी विद्यार्थ्यांचा सराव महत्त्वाचा असल्याचा सल्ला त्यांनी यावेळी दिला. विद्यार्थ्यांनी कधीही हार न मानता आयुष्यात इतरांपेक्षा काही वेगळे करण्याचा प्रयत्न केल्यास यश निश्चितच मिळते. याशिवाय जे आधुनिक तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर करू शकतात त्यांचे भवितव्य उज्ज्वल असल्याचे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षकाचे अनन्यसाधारण स्थान आहे. त्याने केवळ शिक्षकाची भूमिका न बजावता मार्गदर्शकाची भूमिका पार पाडली पाहिजे. सध्याच्या या प्रगत तंत्रज्ञानाच्या युगात सर्वोत्तम शिक्षकाशी संवाद साधून त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ उठविणे सहज शक्य झाले आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच वर्धामध्ये उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले. मान्यवरांच्या मनोगतानंतर पालक व विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना मान्यवरांनी सर्मपक उत्तरे देऊन त्यांच्या शंकांचे निरसन केले. कार्यशाळेसाठी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, विद्यालंकारतर्फे रविवार १० एप्रिल रोजी फिजिक्स, केमेस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स विषयांचे वर्धा येथील कार्यालयात सकाळी ११ या वेळात मार्गदर्शन करण्यात येणार असून, विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीकरिता आणि अ‍ॅप्टीट्युट टेस्ट नोंदणीकरिता ७३८७६७६९१०, यांच्याशी संपर्क साधावा.(उपक्रम प्रतिनिधी)