लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : रविदास महाराजांच्या शिकवणी प्रमाणे सर्व समाज बांधवांनी एकमेकांशी पे्रमभावनेने रहावे. जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी आपण सदैव प्रयत्न करू. कुणाचीही तक्रार असल्यास त्यांनी आपल्यापर्यंती ती निर्भिडपणे मांडावी. लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून विविध विकास कामांसाठी दिला जाणारा निधी समाजपयोगी कामासाठी असून त्याचा उपयोग करून घ्यावा, असे आवाहन खा. रामदास तडस यांनी केले.आरती चौकात रवी मंडळ वर्धाच्या जागेवर सांस्कृतिक सभागृह तयार करण्यात आले आहे. त्याच्या लोकार्पण कार्यक्रमात ते मार्गदर्शन करताना बोलत होते. व्यासपीठावर आ. डॉ. पंकज भोयर, माजी न.प. बांधकाम सभापती निलेश किटे, रंजना पट्टेवार, पांडे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमादरम्यान दा.आ. भगत, शि.ल. गिरडे, ना.डी. पाचखंडे व विपीनकुमार पाटील यांचा सत्कार करण्यात आला. शिवाय गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. कार्यक्रमाला राजू चांदेकर, गायकवाड, काकडे, सुनील गोडबोले, खांडस्कर, हांडे, काकडे, ढाक हजर होते.
जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमीच प्रयत्न करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2018 11:16 PM
रविदास महाराजांच्या शिकवणी प्रमाणे सर्व समाज बांधवांनी एकमेकांशी पे्रमभावनेने रहावे. जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी आपण सदैव प्रयत्न करू. कुणाचीही तक्रार असल्यास त्यांनी आपल्यापर्यंती ती निर्भिडपणे मांडावी.
ठळक मुद्देरामदास तडस : रवी मंडळाच्या जागेवर सांस्कृतिक सभागृह