लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्हा प्रशासनाच्या वर्धा डॉट गो डॉट इन या संकेतस्थळावरून चुकीच्या माहितीचा प्रसार होत असल्याने त्याची दखल घेत ‘जिल्हा प्रशासनाला जुन्यांचा मोह सुटेना!’ या मथळ्याखाली १४ एप्रिलला लोकमतने वृत्त प्रकाशित करून त्याकडे जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. याच वृत्ताची दखल जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाºयांनी घेऊन वर्धा डॉट गो डॉट इन या संकेतस्थळावरील माहितीत सुधारणा केली आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाच्या संकेत स्थळावर कार्यरत अधिकारी अवतरले, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.अमरावती येथे तत्कालीन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांची बदली होऊनही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर जिल्हाधिकारी म्हणून सध्या त्यांचेच नाव कायम होते. यात सुधारणा करून नवीन जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांच्या छायाचित्रासह आवश्यक सुधारित माहिती टाकण्यात आली आहे. तर तत्कालीन पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांच्या जागी वर्र्ध्यात रूजू झालेल्या डॉ. बसवराज तेली यांच्या नावाची सुधारणा करण्यात आली आहे. शिवाय याच संकेतस्थळावर निवासी उपजिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी भूसंपादन सामान्य, उपजिल्हाधिकारी निम्न वर्धा, जिल्हा पुनर्वसन अधिकारी म्हणून बदली झाल्यानंतरही राजलक्ष्मी शाह यांचे नाव कायम होते. तसेच बदली होऊनही उपजिल्हाधिकारी भूमी (विमाविप) चंद्रभान पराते यांचेही नाव कायम होते. ते हटविण्यात आले आहे. याशिवाय आवश्यक व अद्ययावत माहिती सदर वृत्ताची दखल घेऊन अपलोड करण्यात आली आहे. गुरूवारी वृत्त प्रकाशित होताच जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चेला उधाण आले होते.
जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर अवतरले कार्यरत अधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 11:48 PM